बिझनेसनामा ऑनलाईन । देशात सध्या सणासुदींचा काळ सुरु आहे.त्यातच आता येणारी दिवाळी ही सर्वांसाठी अजून खास बनवण्यासाठी मोदी सरकारने एक भेट आणली आहे. हि गोष्ट ऐकून सगळ्याच देशवासीयांना भरपूर आनंद होणार आहे . कारण सरकारने गॅस सिलिंडरवर 300 रुपये सबसिडी (LPG Cylinder Price) जाहीर केली आहे. यापूर्वी सुद्धा सरकारने अशीच सबसिडी 2 महिन्यापूर्वी जाहीर करत जनतेला गिफ्ट दिले होते. आताही सरकारने सणासुदीच्या तोंडावर सिलिंडरवर 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच हा लाभ मिळणार आहे.
केंदीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी LPG Cylinder Price च्या अनुदानाची 300 रुपये केली आहे. यापूर्वी रक्षाबंधन आणि ओनमच्या वेळी सुद्धा सरकारने गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात केली होती, आणि आता पुन्हा उज्ज्वला योजनेचा भाग असलेल्या लाभार्थ्यांसाठी अनुदानाच्या रक्कमेत 100 रुपयांची वाढ केली आहे. अनुराग ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सदर माहिती जाहीर केली. रक्षाबंधन आणि ओणम या सणांच्या वेळी सरकारने दिलेल्या सवलतींचा अनेक गृहिणीना फायदा झाला होता. LPG Cylinder च्या किमतींमध्ये 100 रुपयांची कपात केल्यामुळे 1,100 रुपयांचे सिलिंडर 900 रुपयांत उपलब्ध झाले होते. यावेळी पुन्हा लाभार्थी भगिनींना 300 रुपयांचे अनुदान मिळणार आहे व यामुळे LPG Cylinder केवळ 600 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती महागल्या – LPG Cylinder Price
मागच्या दोन तीन दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती महागल्या आहेत. तेल कंपन्यांकडून ग्राहकांसाठी खरं तर हा मोठा धक्काच होता. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 209 रुपयांची वाढ झाली होती. हा नवीन दर 1 ऑक्टोबर पासून अंमलात आणण्यात आला व महिन्याची सुरुवातच महागाईच्या धक्क्याने करावी लागली होती. मात्र आज आलेल्या बातमीमुळे कुठेतरी थोडासा दिलासा मिळण्याची आशा आहे.