LPG Cylinder Price : जुन्या वर्षाला मागे सारत, आज नवीन वर्षाची सुरुवात झाली. नवीन वर्ष म्हणजे नवीन योजना, नवीन इच्छा आणि नवीन जिद्ध. वर्ष सुरु होतानाच सरकारडून आपल्याला एक ना अनेक आनंदाच्या बातम्या मिळायला सुरुवात झाली होती. आणि हा आनंद इथेच सीमित होत नाही कारण आज सरकारी तेल कंपन्यांनी देखील ग्राहकांना नूतन वर्षाची भेट दिली आहे. हि बातमी वाचून नक्कीच तुमच्या वर्षाची सुंदर सुरुवात होणार आहे. आज गॅस सिलिंडर कंपन्यांनी नवीन दर जाहीर केले आहेत आणि या दरांमध्ये काही टक्क्यांची घट करवण्यात आली आहे. गॅसच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्या हे आज आपण जाणून घेऊयात…..
व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किमती बदलल्या : (LPG Cylinder Price )
सरकारी गॅस सिलिंडर कंपन्यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच व्यवसायिक सिलिंडरचे दर आटोक्यात आणल्यामुळे देशातील सामान्य जनतेला नूतनवर्षाचं मोठं गिफ्ट मिळालं आहे. सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल (IOC), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. आजपासून 19 किलोचा सिलिंडर एक ते दीड रुपये कमी दरांत विकण्यात येईल. हि घट अगदीच हलकी आहे, मात्र महिन्याभरात सलग दुसऱ्या वेळा व्यवयसायिक सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचा दर मात्र कायम आहे आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या अगोदर गॅस सिलिंडर कंपन्यांकडून22 डिसेंबर रोजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या, त्यानंतर 19 किलोचा सिलिंडर 30.50 रुपयांनी बाजारात विकला जायचा. लक्ष्यात घ्या कि तेल कंपन्या दर पंधरावढ्याने सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात.
LPG सिलिंडरचे नवीन भाव काय? (LPG Cylinder Price Drop)
आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला LPG सिलिंडरच्या किमती बदलल्यानंतर देशाच्या प्रमुख शहरांमध्ये LPG सिलिंडरच्या किमतीत खालील प्रमाणे बदल झाले आहेत
दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 1,755.50 रुपये झाली आहे. याआधी हा दर 1,757 रुपये होता, त्यामुळे दिल्लीत दर दीड रुपयांनी कमी झाले आहेत. तसेच चेन्नईमध्ये LPG च्या किंमतीत सर्वाधिक 4.50 रुपयांची कपात करण्यात आली असून 19 किलोचा सिलेंडर आता 1,924.50 रुपयांना उपलब्ध झाला आहे आणि मुंबईमध्ये सिलेंडरचा दर 1.50 रुपयांनी घसरून 1,708.50 रुपये झाला आहे तर शेवटी कलकत्त्यात व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 50 पैशांनी वाढली असून आज दर 1,869 रुपये आहे.
घरगुती सिलिंडरचे भाव जैसे थे!!
कंपन्यांनी व्यवसायिक सिलिंडरच्या किमती बदलावल्या असल्या तरीही 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरचे दर अद्याप बदलेले नाहीत. घरगुती सिलिंडरच्या किमतींमध्ये शेवटचा बदल ऑक्टोबर महिन्यात करण्यात आला होता आणि त्यानंतर गेल्या चार महिन्यांत घरगुती सिलिंडरचे भाव जराही बदललेले नाहीत. आजही देशातील प्रमुख शहरांमध्ये घरगुती सिलिंडरचे भाव खालील प्रमाणे आहेत:
मुंबई: 902.50 रुपये
दिल्ली: 903 रुपये
चेन्नई: 918.50 रुपये
कलकत्ता: 929 रुपये