LPG Cylinder Price : गॅस सिलिंडर झाला स्वस्त; इतक्या रुपयांनी दर घसरले

बिझनेसनामा ऑनलाईन । दिवाळीनंतर आता सर्वसामान्य जनतेसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. LPG गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. व्यावसायिक सिलिंडरांच्या किमती 57.50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. त्यामुळे हॉटेल चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परतू घरगुती गॅसच्या किमतीमध्ये मात्र कोणताही बदल पाहायला मिळत नाही.

तेल कंपन्यांकडून देण्यात आलेली माहिती सांगते कि गुरुवार दिनांक 16 नोव्हेंबर 2023 पासून देशात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमती (LPG Cylinder Price) कमी झाल्या आहेत. 19 किलोच्या सिलिंडरवर आता थोडा दिलासा मिळणार आहे, कारण सिलिंडरच्या किमतींमध्ये आता 57.50 रुपयांची घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी दिवाळीपूर्वी 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 101.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता मात्र दर कमी झाल्यामुळे काही प्रमाणात का होईना पण जनतेला दिलासा मिळाला आहे.

असे आहेत नवीन दर: LPG Cylinder Price

LPG Cylinderच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे आणि देशवासियांना यामुळे दिवाळीचे गिफ्ट मिळालं असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. नवीन बदलानंतर, 19 किलोच्या सिलिंडरची किंमत महत्वाच्या शहरांमध्ये खालील प्रमाणे बदलल्या आहेत: राजधानी दिल्लीमध्ये आता प्रत्येक सिलिंडरवर 1755.50 रुपये असा दर लावला जात आहे तर कोलकात्यात 1885.50 रुपयांमध्ये सिलिंडर विकले जात आहेत शेवटी मुंबईत 1728 रुपये व चेन्नईमध्ये 1942 रुपये प्रति सिलिंडररांची विक्री सुरु आहे.