LPG Cylinder Price । आजपासून ऑक्टोबर महिना सुरु झाला असून पहिल्याच दिवशी जनतेला मोठा आर्थिक झटका बसला आहे. आजपासून LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 209 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मात्र फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठीच ही दरवाढ करण्यात आलेली आहे. घरगुरी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. परंतु व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्याने हॉटेल मधील खाणं मात्र आता महाग होणार आहे.
आता किती असेल दर – LPG Cylinder Price
गॅस सिलिंडर किमतीमधील या वाढीनंतर राजधानी दिल्लीत 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1731.50 रुपयांना (LPG Cylinder Price) विकला जात आहे. यापूर्वी हाच दर 1522.50 रुपये होता. याशिवाय कोलकाता मध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1,839.50 रुपये, चेन्नईत 1898 तर मुंबईत 1,684 रुपये झाली आहे. एकीकडे संपूर्ण देशात आता सणासुदीचा काळ असताना दुसरीकडे गॅसच्या किमती वाढल्याने जनतेला मोठा धक्का बसला आहे.
घरगुरी गॅसच्या किमती जैसे थे
एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत (LPG Cylinder Price) वाढ झाली असताना दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 14.20 किलोचा घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपयांना उपलब्ध आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ न झाल्याने गृहिणींना दिलासा मिळाला असला तर व्यवसाय करणार्यांना मात्र आता मोठी आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.