LPG Gas Accident Insurance । पूर्वी स्वयंपाक करण्यासाठी चूल वापरण्यात येत होती. त्यावेळी गॅस सिलेंडर अस्तित्वात नव्हते. परंतु चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे बरेच रोग महिलांना होत होते. त्यानंतर काळ बदलला आणि गॅस सिलेंडर वापरणे सुरु झाले. गॅस सिलेंडर वापरणे एवढे सोपे आहे हे लोकांना समजल्या नंतर आणि सरकारनं उज्वला योजना सुरु केल्यानंतर आता प्रत्येकाच्या घरात गॅस सिलेंडर उपलब्ध आहे. आता घराघरात गॅस सिलेंडर वापरले जात असले तरीही तुम्ही गॅसमुळे झालेल्या अपघाताबद्दल किंवा स्फोटाबद्दल ऐकलं असेल.
बऱ्याचदा महिला स्वयंपाकाच्या नादात गॅस सिलेंडरचे बटन बंद करायचं विसरून जातात. तर कधी कधी गॅस चे बटन सुरु राहते पण त्यातून गॅस येत नाही. त्यामुळे स्फोट होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात वाढतात. अशी दुर्घटना घडल्यानंतर गॅस कंपनी कडून विम्याची सुविधा दिली जाते. याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे.
किती पैसे मिळतात- (LPG Gas Accident Insurance)
जेव्हा तुम्ही गॅस सिलेंडर चे नवीन कनेक्शन घेतात. तेव्हा त्यासोबत तुम्हाला वैयक्तिक अपघात कवच दिले जाते. त्याचबरोबर गॅसचा स्फोट किंवा गॅस गळती झाल्यामुळे आग लागल्यास होणारं नुकसान कंपनीकडून भरून दिले जाते. यासाठी या वैयक्तिक अपघात कवच मध्ये 50 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तर प्रति व्यक्ती जास्तीत जास्त १० लाखांची मदत मिळते. जर या अपघातावेळी कोणाचा मृत्यू झालास त्यांना 5 लाखांची भरपाई दिली जाते. एवढेच नाही तर या अपघातामध्ये तात्काळ मदत म्हणून प्रत्येक व्यक्तीला 25 हजार रुपये आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी 1 लाख रुपयांची भरपाई दिली जाते.
विम्यासाठी दावा कसा करावा?
गॅस सिलिंडर अपघातानंतर विम्यावर दावा (LPG Gas Accident Insurance) करण्यासाठी ग्राहकाने अपघात झाल्याच्या ३० दिवसांच्या आत त्याच्या वितरकाला आणि जवळच्या पोलिस स्टेशनला अपघाताची तक्रार करावी. गॅस अपघाताच्या FIR ची कॉपी पोलिसांकडून घ्यावी. त्यासोबत वैद्यकीय पावती, रुग्णालयाचे बिल, शवविच्छेदन अहवाल आणि मृत्यूचे प्रमाणपत्रही तुमच्याकडे असंणे आवश्यक आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावावर सिलिंडर आहे त्यालाच विम्याची रक्कम मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्ही कोणालाही नॉमिनी बनवू शकत नाही. तसेच दाव्याचा लाभ फक्त अशा लोकांनाच मिळेल ज्यांचे सिलेंडर पाईप, स्टोव्ह आणि रेग्युलेटर ISI मार्कचे आहेत.