155 रुपयांत मिळणार Gas Cylinder; सरकारचा मोठा निर्णय

बिझनेसनामा ऑनलाईन । सर्वसामान्य जनता महागाईमुळे त्रस्त आहे. त्याचबरोबर हातावर पोट असलेल्या नागरिकांचे पैसा अभावी प्रचंड हाल होताना दिसतात. आजकाल सर्वच गोष्टी महागल्यामुळे खाणार पिणार काय? असा प्रश्न उपस्थित राहतो. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, भाजीपाला महाग झाल्यामुळे नोकरी करणाऱ्यांना सुद्धा हे भाव परवडत नाही. अशातच सिलेंडरचे भाव कमी न होता वाढतच चालले आहेत. त्यामुळे लाखो कुटुंबाचे आर्थिक बजट कोलमडले असल्याचं दिसून येतं. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार लवकरच गॅस सिलेंडर बद्दल एक चांगला निर्णय घेण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपनी लवकरच २ किलोचा गॅस सिलिंडर आणण्याच्या तयारीत असून त्याची किंमत फक्त 155 रुपये असू शकतो. पेट्रोलियम कंपनीने 5 किलोग्राम चे कंपॉझिट सिलेंडर लॉन्च केले होते. त्याचबरोबर आता 2 किलोग्रॅमचे सिलेंडर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सिलेंडर ची किंमत 1100 रुपये एवढी असून ही किंमत सर्वसामान्य कुटुंबाला परवडणारी नाही. सर्वसामान्य कुटुंबातील लोकांसाठी 1000 रुपये ही खूप मोठी गोष्ट झाली. त्यामुळे या कंपनीने अशा लोकांसाठी मुन्ना कंपोझिट सिलेंडर डिझाईन केलं आहे. या सिलेंडर मध्ये दोन किलोग्रॅम गॅस बसतो. त्याचबरोबर याची किंमत ही सर्वांना परवडू शकते. 155 रुपयांमध्ये हा गॅस येणार आहे. परंतु ज्या लोकांचे कुटुंब लहान आहे अशा कुटुंबाचाच हा छोटा गॅस सिलिंडर परवडू शकतो.

यापूर्वी देखील पेट्रोलियम कंपनीने छोटू कंपोझिट सिलेंडर लॉन्च केला होता. हा छोटू सिलेंडर 10 किलोग्रॅम चा असून यामध्ये 10 किलोग्रॅम गॅस भरला जातो. परंतु हा सिलेंडर छोटा असला तरीही तो मजबूत आहे. याचबरोबर 7 किलोग्राम चा देखील कंपोझिट सिलेंडर उपलब्ध आहे. सध्या वापरल्या जाणाऱ्या घरगुती सिलेंडरचे वजन 14.2 किलो असून त्याची किंमत ११०० रुपयांच्या वर गेली आहे. त्यामुळे गरीब कुटुंबाला दर महिन्याला इतक्या मोठ्या रकमेचा खर्च परवडत नाही. अशा वेळी हा छोटा सिलिंडर गरीब आणि लहान कुटुंबासाठी वरदान ठरेल.