LPG Gas Cylinder Price : गॅसच्या किमतींबाबत मोठी अपडेट; आजपासून तुमच्या शहरात दर किती?

बिझनेसनामा ऑनलाईन । आज म्हणजेच 1 जुलैला LPG गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत (LPG Gas Cylinder Price) नवे अपडेट समोर आलं आहेत. देशामध्ये घरगुती एलपीजी गॅसच्या किमती मागच्या वर्षी म्हणजेच जुलै 2022 मध्ये बदलण्यात आल्या होत्या. त्यानंतर या घरगुती सिलेंडर मध्ये कोणताही बदल करण्यात आला नव्हता. आज देखील इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

कोणत्या शहरात किती रुपये दर – (LPG Gas Cylinder Price)

दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्ता या शहरात घरगुती गॅसच्या किमती जशास तशा आहेत. घरगुती एलपीजीची किंमत मुंबईमध्ये 1102.5 रुपये आहे. तर दिल्लीमध्ये 1103, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, जयपूर 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपये आहे. गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ होऊन सिलिंडरची किंमत 1053 रुपयावरून 1103 रुपये झाली. त्यानंतर मात्र अजून तरी या किमतीत (LPG Gas Cylinder Price) कोणतीही वाढ पाहायला मिळालेली नाही.

कमर्शियल गॅस किमतीमध्ये काही महिन्यांपासून घसरण –

घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये (LPG Gas Cylinder Price) बदल झालेला नसला तरीही जून महिन्यात कमर्शियल गॅस किमतीमध्ये बदल झाले होते. दिल्ली मध्ये व्यावसायिक गॅसचे भाव 83.3 रुपयांनी कमी झाले होते. यापूर्वी दिल्लीत व्यावसायिक गॅस चे भाव हे 1 हजार 856 एवढे होते. आता भाव कमी होऊन 1773 वर पोहोचले आहे . चेन्नई मध्ये कमर्शियल गॅसचे भाव 1937 एवढे असून कोलकत्ता मध्ये 1975 रुपये एवढी किंमत आहे . मुंबईमध्ये कमर्शियल एलपीजी गॅसची किंमत 1725 रुपये करण्यात आलेली आहे . व्यावसायिक गॅसचे दर कमी झाले आहे पण घरगुती गॅस च्या किमती जैसे थे आहेत.