LPG Gas Price : गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा वाढ; तुमच्या शहरांत दर किती?

बिझनेसनामा ऑनलाईन । आजपासून पेट्रोलियम मंत्रालयाने कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये वाढ (LPG Gas Price) केली आहे. काही दिवसांपूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव कमी करण्यात आले होते. परंतु आता व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आले आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव वाढले असले तरीही घरगुती गॅस सिलेंडरचे भाव मात्र जशास तसे आहे. प्रत्येक महिन्यात सिलेंडरच्या किमती अपडेट करण्यात येतात. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याचा सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेल वितरण कंपनी गॅसच्या किमती अपडेट करत असतात.

आजपासून 19 किलोच्या कमर्शियल एलपीजी सिलेंडरची (LPG Gas Price) किंमत 1780 करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोलकत्ता मध्ये या गॅस सिलेंडरची किंमत 1882.50 रुपये एवढी तर मुंबईमध्ये 1732 रुपये, चेन्नई मध्ये 1944 रुपये एवढी करण्यात आली आहे. यापूर्वी कमर्शियल गॅस सिलेंडरची किंमत कमी होती. मात्र या महिन्यात या किंमतीत 7 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये कमर्शियल गॅस सिलेंडरचे भाव 1773 रुपये एवढे होते. चेन्नई मध्ये 1937, कोलकत्ता मध्ये 1875.50 रुपये एवढी किंमत होती. मुंबई मध्ये एलपीजी व्यावसायिक गॅसची किंमत 1725 रुपये करण्यात आली होती. व्यावसायिक गॅसचे दर वाढले आहे पण घरगुती गॅस च्या किमती जैसे थे आहेत.

घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही – LPG Gas Price

कमर्शियल गॅस च्या किमती वाढल्या (LPG Gas Price) असल्या तरीही घरगुती गॅसच्या किमतीमध्ये काहीच फरक पडलेला नाही. त्यामुळे दिल्ली, चेन्नई, मुंबई, कोलकत्ता या शहरात घरगुती गॅसच्या किमती जशास तशा आहेत. घरगुती एलपीजीच्या किंमत मुंबईमध्ये 1102.5 रुपये, दिल्लीमध्ये 1103, लेहमध्ये 1340, भोपाळमध्ये 1108.5, जयपूर 1106.5, बंगळुरूमध्ये 1105.5 रुपये आणि श्रीनगरमध्ये 1219 रुपये त्याचबरोबर नोएडा मध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1100.50 रुपये, गुरुग्राम मध्ये 1111.50, भुवनेश्वर 1129.00, चंदीगड 1112.50 रुपये, हैद्राबाद 1115.00, लखनऊ 1140.50 रुपये आणि पटना मध्ये 1201.00 रुपये किंमत आहे.