LPG Price Hike : आजच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल झाल्याची बातमी समोर आली आहे, यामुळे आता देशात अनेक नवीन बदल होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. पण यावरच खुश होऊ नका, कारण आजच अजून एक बातमी माध्यायमांना मिळाली, जिचा परिणाम थेट तुमच्या खिश्यावर होऊ शकतो. आता तुमच्या खिश्यावर कात्री फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र हि परिस्थिती नेमकी कोणामुळे उत्पन्न झाली हे जाणून घेऊया. आज डिसेंबरचा पहिला दिवस आहे आणि आता आपण वर्ष 2024 च्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत. याच क्षणी गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सामान्य जनतेला याचा फटका बसणार आहे. गॅस सिलिंडर हि प्रत्येक सामान्य घरातील मुलभूत गरज असल्यामुळे याचा परिणाम सर्वसाधारण घरांवर होणं स्वाभाविक आहे…
देशात गॅस सिलिंडरच्या किमती वाढल्या: (LPG Price Hike)
देशाची राजधानी म्हणजे दिल्ली, आज दिल्लीत 19 किलोच्या सिलिंडरच्या किमती 1775.50 रुपयांवरून वाढत 1796.50 येऊन पोहोचल्या आहेत. यामुळे रहिवाश्यांना वर्षाच्या शेवटी पहिला फटका बसला आहे. महीन्याच्या पहिल्याच दिवशी ऑयल मार्केटिंग कंपन्यांनी सिलिंडरच्या किमतींमध्ये 21 रुपयांची वाढ केल्यामुळे सामान्य जनतेसमोर काहीही मार्ग शिल्लक राहिलेला नाही.
दिवाळीच्या काही दिवसांपूर्वी ऑयल मार्केटिंग कंपन्यांकडून सिलिंडरच्या किमतींमध्ये 103 रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र छठ पूजेच्या निमित्ताने यात काही अंशी सूट देण्यात आली, यामुळे सामान्य जनतेला काही काळासाठी दिलासाही मिळाला होता. आणि स्वाभाविकपणे येणाऱ्या काळात या किमती अश्याच राहतील किंवा त्यात अजून वाढ होणार नाही असा अंदाज आपण बांधला होता. मात्र आता पुन्हा हि महागाईची (LPG Price Hike) बातमी मिळाल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
देशातील विविध राज्यांमध्ये सिलिंडरच्या किमती बदलल्या:
सर्वात आधी देशातील प्रमुख राज्य म्हणजेच राजधानी दिल्ली येथे वाढलेल्या किमती जाणून घेऊया. वरती म्हटल्याप्रमाणेच राजधानीत गॅस सिलिंडरची नवीन किंमत 1796.50 प्रती 19 किलो सिलिंडर अशी आहे(LPG Price Hike). तर कलकत्त्यात सध्या सिलिंडरची किंमत 1885.50 वरून वाढत 1908.00 रुपयांवर पोहोचलेली आहे. मुंबई हे देशातील अनेक महत्वाच्या शहरांपैकी एक, मुंबईला आपण देशाची आर्थिक राजधानी असेही म्हणतो. मात्र आर्थिक राजधानीतही सिलिंडरच्या वाढलेल्या किमतींचा फटका बसणार आहे, कारण इथे गॅस सिलिंडरची किमत 1728.00 वरून वाढत 1749.00 येऊन पोहोचली आहे. तसेच चेन्नईमध्ये गॅस सिलिंडर1942.00 वरून वाढत 1968.50 रुपयांत विकले जाणार आहेत. मात्र आनंदाची बातमी म्हणजे अद्याप तरी ऑयल कंपन्यांनी 14 किलोच्या सिलिंडरच्या किमतींमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत.