L&T Penalty : ‘या’ भारतीय कंपनीवर कतारने लावली पेनल्टी, भरावी लागणार मोठी रक्कम

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील इंजिनियरिंग आणि बांधकाम क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणजे लार्सन एंड टुब्रो. या भारतीय कंपनीच्या विरोधात कतारमधून काही गंभीर आरोप लावण्यात आले असून आता कंपनीला एक मोठी रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागणार आहे. हा मामला इन्कम टेक्सच्या बाबतीत असल्यामुळे कंपनीला दंडाची रक्कम भरणं क्रमप्राप्त झालं आहे. कंपनीने स्वतः याबद्दल माहिती दिली असून तिला 111.31 कोटी रुपयांची पेनल्टी भरावी लागणार आहे (L&T Penalty) पण कंपनीचे संकट इथेच थांबत नाही कारण त्यांना अजून एक 127.64 कोटी रुपयांची पेनल्टी भरणं अनिवार्य आहे, म्हणजेच या दिग्गज कंपनीच्या नवे एकूण दोन मोठ्या रकमा भरण्याची चिंता ओढवली आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 आणि एप्रिल 2017 ते मार्च 2018च्या काळासाठी हि रक्कम भरावी लागणार आहे.

का भरावी लागणार आहे पेनल्टी? (L&T Penalty)

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार इन्कम टेक्सच्या बाबतीत काही आकडे न जुळल्यामुळे त्यांच्या नावे हि पेनल्टी जारी करण्यात आली. कंपनीने कतारमधल्या इन्कम टॅक्स विभागाला दिलेले आकडे काही टेक्स असेसमेंटच्या आकड्यांसोबत जुळले नाहीत आणि म्हणूनच हि कारवाई करण्यात आली आहे. कतार इन्कम टॅक्स विभागाने कंपनीवर चुकीचा आकडा दिल्याचा आरोप केला असून कंपनीने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत, तसेच कंपनीने प्रकरणासंदर्भात अपील केलं असून तिला विश्वास आहे कि निकाल हा त्यांच्या पक्ष्यातच असेल. सोबतच कंपनी ठामपणे सांगते कि या चर्चांचा आणि घडामोडींचा त्यांच्या व्यवसायावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही.

कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण लार्सन एंड टुब्रो (L&T Penalty) हि कंपनी देशातील अनेक दिग्गज कंपन्यांपैकी एक आहे. आणि हि कंपनी देशात तसेच विदेशातील अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करते. आता हा आरोप इन्कम टॅक्स विभागातर्फे लावला गेला असल्यामुळे कदाचित कंपनीला काही प्रमाणात नुकसान सोसावे लागू शकते, पण कंपनीचा आपल्या ग्राहकांवर दृढ विश्वास असल्याने तिला याची परवा करण्याची गरज वाटत नाही.