Madhabi Puri Buch Story: आर्थिक गुन्हेगारीवर कडक कारवाई करणारी कोण आहे SEBI ची पहिली महिला प्रमुख?

Madhabi Puri Buch Story: जागतिक माहीलादिनाच्या निमित्ताने आज जगभरात स्त्रीशक्तीचा सन्मान केला जातो आणि आम्ही देखील याचे दिवसाचे औचित्य साधून तुम्हाला एका खास महिलेची गोष्ट उलघडून दाखवणार आहोत. आपल्या आजूबाजूला अनेक गुन्हे घडतात, सामान्य लोकं त्याला बळी पडतात आणि काही तारणहार त्यांना या सर्व प्रकारच्या संकटांतून सोडवतात अशी अनेक उदाहरणं तुम्ही पहिली किंवा ऐकली असतीलच. या सगळ्यात महत्वाचा धागा आहे तो म्हणजे SEBI, आर्थिक गुन्हेगारीवर कडक कारवाई करण्यासाठी सेबी (SEBI) नेहमीच सतर्कपणे कार्य करत आली आहे आणि याच सेबीची ओळख, चेहरा म्हणजे माधवी (माधबी पुरी बुच). अजय त्यागी यांच्यानंतर माधवी या सेबीची जबाबदारी सांभाळतात आणि हं!! त्या सेबीच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत.

कशी आहे माधवी बूच यांची कहाणी? (Madhabi Puri Buch Story)

IIM अहमदाबादची माजी विद्यार्थिनी माधवी बुच यांनी तब्बल तीस वर्षांहून अधिक अनुभव पुंजी बाजार आणि बँकिंग क्षेत्रात मिळली आहे. त्यांनी ICICI बँकेच्या संचालक मंडळावर कार्यकारी संचालक म्हणून काम केले आणि नंतर फेब्रुवारी 2009 ते मे 2011 पर्यंत ICICI Securities च्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पडली, त्यानंतर त्यांनी सिंगापूरस्थित Greater Specific Capital LLP आणि शांघायमधील नवीन विकास बँकेमध्येही यशस्वी कामगिरी दर्शवली आहे.

SEBI मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारी अधिकारी:

भारतीय Securities and Exchange Board (SEBI) मध्ये काम करताना माधवी (Madhabi Puri Buch Story) यांनी अतिशय महत्वाचे विभाग हाताळले. त्यांनी बाजार नियमन विभाग(Department of Market Regulation), बाजार मध्यस्थी नियमन आणि देखरेख विभाग(Department of Market Intermediation Regulation and Supervision), एकीकृत निरीक्षण विभाग(Integrated Monitoring Division)यासारख्या विभागांची जबाबदारी सांभाळली आहे. फक्त इतकंच नाही तर डिसेंबर वर्ष 2021 मध्ये बाजारात होणारे गैरव्यवहारांवर निर्बंध लावण्यासाठी ‘अत्याधुनिक नियामक आणि तंत्रज्ञान समाधान’ (Alerts) सल्लागार समितीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.