बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. मसाला बनवणाऱ्या कंपन्यांपैकी एक मधुसुधन मसाला (Madhusudan Masala IPO) या कंपनीचा IPO या आठवड्यात मार्केट मध्ये येणार आहे. गुजरातमधील या कंपनीने 18 सप्टेंबर रोजी आपला IPO बाजारात मांडण्याची घोषणा केली आहे. आज आपण मधुसुधन मसाला IPO बाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
काय असेल IPO साठी प्राईझ बँड? Madhusudan Masala IPO
गेल्या बत्तीस वर्षांपासून मधुसुधन मसाला हि कंपनी आपला मसाल्यांचा व्यवहार करत आहे. या कंपनीचे प्रोडाक्स ‘डबल हाथी’ व ‘ महाराजा’ या ब्रांडच्या नावाखाली विकले जातात. IOP मांडण्याची घोषणा (Madhusudan Masala IPO) करताना मधुसुधन मसाला या कंपनीने IOP ची प्रति शेअर प्राईझ बँड किंमत 66 ते 70 रुपये ठेवली आहे. कंपनी आपल्या IPO सह तब्बल 34 लाख इक्विटी शेअर विक्रीसाठी मांडणार आहे. या IPO मधून सुमारे 23.80 कोटी रुपये उभारण्याची तयारी कंपनी करत आहे.
तब्बल 50% शेअर्स QIB साठी आरक्षित
यातील 1.72 लाख शेअर्स हे मार्केट मेकर्ससाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 32.28 लाख शेअर्स हे नेट इशू साईझसाठी बाजूला केलेले आहेत, व याच नेट इशूचा तब्बल अर्धा भाग QIB म्हणजेच Qualified Institutional Buyers साठी आरक्षित करून ठेवण्यात आला आहे. राहिलेला 35% भाग हा Retail Investors यांच्यासाठी आहे, तर शेवटचा 15% भाग हा High Net worth Individual(HNI) च्या नावे मंजूर करण्यात आलेला आहे. (Madhusudhan Masala IOP).
दरम्यान Anchor Investors साठी 15 सप्टेंबरचा दिवस निश्चित करण्यात आला आहे. यानंतर 21 सप्टेंबरला कंपनीचा IOP बंद होईल. गुंतवणूकदार आपल्या लॉट प्रमाणे बोली लाऊ शकतात, कंपनीच्या एका लॉटमध्ये दोन हजार शेअर्स असतील. Retail Investors एका लॉटसाठी बोली लाऊ शकतात. मात्र यासाठी त्यांना 1.4 लाखांची गुंतवणूक करावी लागेल.