Maha E Seva Kendra : जसं की आपन्न सगळेच जाणतो हे ऑनलाईन जग आहे. इथे जास्तीत जास्त गोष्टी ऑनलाईन पद्धतीने हाताळल्या जातात. जेणेकरून वेळाही वाचतो आणि घर आभार न पडता घर बसल्या जास्तीत जास्त कामं होऊन जातात. सरकार देखील याची दाखल घेत अधिकाधिक सेवा ऑनलाईन माध्यमातून देऊ करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडून महा ई-सेवा केंद्र ( Maha E-Seva) सुरु करण्यात आले आहे, जिथून नागरिकांना अनेक शासकीय सेवांचा लाभ घेता येतो. तुम्ही स्वतः महा ई-सेवा केंद्र सेवा सुरु करू शकता. त्यासाठी काय पात्रता लागते? कोणकोणती कागदपत्र आवश्यक आहेत आणि मुख्य म्हणजे अर्ज कसा करायचा हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
काय आहे महा ई-सेवा (Maha E Seva Kendra )?
ही डिजिटल सुविधा महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हा यामागील उद्देश आहे. सरकारी कामांना किचकट व वेळखाऊ समजलं जात. नागरिकांसाठी कामकाज सोप्पे व्हाव म्हणून सरकारतर्फे हि सुविधा सुरु करण्यात येणार आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवेंसाठी याठिकाणी ऑनलाईन अर्ज भारता येणार आहे.
राज्यातील नागरिक हि महा ई-सेवा सुरु करून स्वतःसाठी उत्पन्नाचे साधन तयार करू शकतात. इतरांना शासकीय सेवा उपलब्ध करून देणे अशी या सेवेची धारणा असेल. मात्र हे केंद्र सुरु करण्यासाठी तुम्हाला अधिकृत साईटवर नोंदणी करावी लागते. यामुळे आता नागरिकांना कोणत्याही सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन सरकारी कामं पूर्ण करण्याची गरज नाही. ई-सेवेच्या मदतीने हि कामा घरच्या घरी करता येतील.
महा ई-सेवा( Maha E-Seva) कोणत्या सुविधा देईल?
१) G2C: इम्प्लोय्मेंट एक्ष्चन्ज( Employment Exchange), लेंड रेकॉर्ड ( Land Record), पेन कार्ड ( Pan Card), सोशल पेन्शन ( Social Pension) इत्यादी.
२) B2C: बस तिकीट ( Bus Ticket), रेल्वे तिकीट ( Railway Ticket), मनी ट्रान्स्फर ( Money Transfer) इत्यादी.
३) शिक्षण: सुविधा केंद्र, डिजिटल माहिती इत्यादी .
४) शेती: शेतकरी नोंदणी, हवामान अंदाज,माती परीक्षण इत्यादी.
५) युटीलीटी( Utility): वीज बिल, पाणी बिल इत्यादी.
महा ई-सेवा केंद्र करण्यासाठी पात्रता काय हवी?
महा ई-सेवा केंद्र (Maha E Seva Kendra) सुरु करणारा माणूस हा महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे वय 18 किंवा त्याहून अधिक असावे.
ई सेवा( Maha E-Seva) सुरु करण्याची शैक्षणिक पात्रता 10वी असली तरीही अर्जदाराला मराठी व इंग्रजी भाषेचे व्यवस्थित ज्ञान असणे बंधनकारक आहे, यसोबतच सोबतच कॅम्पुटर हताळता येणे हे अर्जदारासाठी महत्वाचे आहे.
तुमच्याजवळ स्केनर,वेबकेम,प्रिंटर, 4 तासांचा बेटरी बेकप,120GB हार्ड डिस्क,512MB रॅम , Windows XP-SP2 इत्यादी गोष्टी असणे फारच महत्वाचे आहे.
महत्वाची कागदपत्रे:
आधार कार्ड, रहिवासी दाखला , वयाचा पुरावा, E-mail ID, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर, उत्पन्नाचा दाखला.
महा ई-सेवा केंद्रासाठी अर्ज कसा कराल?
१) सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत साईटला भेट द्या.
२) नवीन पेज वरील New User Registration चा पर्याय निवडा. इथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील, पर्याय एक मध्ये मोबाईल नंबर- OTP आणि User ID-Password टाकावा लागेल. तर पर्याय दोन मध्ये तुम्हाला अर्जाचा तपशील, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.
३) यानंतर सर्व महत्वाची कागदपत्रे समाविष्ट करा.
४) Register हा पर्याय निवडून अर्ज पुर्ण करा.
महा ई-सेवेचा फायदा कसा करवून घ्याल?
१) सेवा शोधणे:
सगळ्यात आधी अधिकृत साईटला भेट द्या. नवीन पेजवर शोध सेवेचा पर्याय निवडा, डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला अपेक्षित सेवेचे नाव टाका व सर्चचा पर्याय निवडा.
२) अर्ज ट्रॅक करणे :
अधिकृत साईटवर जाऊन Track Your Application हा पर्याय निवडा. इथे विचारलेली माहिती व applicationचा ID टाका.
३) प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी:
अधिकृत साईटवर जाऊन Verify Your Authenticated Certificate चा पर्याय निवडा. या नंतर विचारलेली माहिती व अर्जाचा आयडी द्या.
४) महा ई-केंद्राची माहिती पाहणे:
सर्वात आधी अधिकृत साईटवर जाऊन तुमच्या तालुका व जिल्ह्याची माहिती द्या. या नंतर महा ई-केंद्राची यादी तुमच्या स्क्रीनवर असेल.
महा ई-सेवेचे App कसे डाउनलोड कराल?
१) सर्वात आधी Google Play Storeवर जाऊन Maha E-Seva/Maharashtra E-Seva हा पर्याय निवडा.
२) यादीत सर्वात वरती असलेल्या पर्यायावर क्लिक करून Install चा पर्याय निवडा. या नंतर एप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड झालेला असेल.