Mahila Samman Savings Certificate योजनेला मोठा प्रतिसाद,10 लाख महिलांनी उघडली खाती; काय आहेत फायदे?

बिझनेसनामा ऑनलाईन । महिला वर्ग बऱ्याचदा पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनेमध्ये पैसे गुंतवणूक करत असतात. मग ती FD असेल, बचत खाते किंवा सेविंग खाते असेल. याच संदर्भात यावर्षीच्या आर्थिक बजेटमध्ये वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी महिलांसाठी खास स्कीम आणली आहे. महिला सन्मान सर्टिफिकेट योजना असं या योजनेचं नाव असून ही एक सेविंग स्कीम आहे. एप्रिल 2023 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे.

केंद्राच्या या योजनेला देशभरातून महिलांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. फक्त तीन महिन्याच्या कालावधीमध्ये 10 लाख महिलांनी यामध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर यासोबत तब्बल 6000 कोटी रुपये जमा झालेले आहेत. ही योजना फक्त महिलांसाठी नसून तरुणी देखील या योजनेमध्ये अकाउंट ओपन करू शकतात.

कशी करावी गुंतवणूक –

या महिला सन्मान सर्टिफिकेट योजनेच्या अंतर्गत महिलांना पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडावे लागेल, त्यानंतर या बचत खात्यामध्ये 1 हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. या रकमेवर 7.5% व्याजदराने रिटर्न देण्यात येणार असून जर तुम्ही दोन लाख रुपये जमा केले तर दोन वर्षानंतर तुम्हाला दोन लाख 32 हजार रुपये मिळतील. म्हणजेच बँकांच्या तुलनेत जास्त व्याज या योजनेतून मिळणार आहे. त्याचबरोबर जर एक वर्षानंतर तुम्हाला पैसे काढायचे असतील तर 40% रक्कम तुम्ही काढू शकतात. या योजनेत बचत खातेधारकाला कोणत्याही प्रकारचा कर यावर द्यावा लागणार नसून 2025 पर्यंत हे खाते उघडता येणार आहे. यासाठी केंद्र सरकारने ICICI, HDFC, IDBI, या बँकेसह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ही योजना राबवण्यास सांगितलेली आहे.

या डॉक्युमेंटची आवश्यकता –

या योजनेसाठी आधार कार्डची झेरॉक्स, दोन पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची आवश्यकता असेल. त्याचबरोबर जर 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम महिलांनी भरली तर त्यांना पॅन कार्ड देखील अनिवार्य असेल. त्याचबरोबर जर तुम्ही एकदा या योजनेअंतर्गत बचत खाते उघडले तर पुन्हा तीन महिन्यापर्यंत दुसरे बचत खाते उघडता येणार नाही.