Majhi Kanya Bhagyashree Yojana : मुलीच्या जन्मानंतर सरकार देतंय 50,000 रुपये; फक्त पूर्ण करा ‘या’ अटी

बिझनेसनामा ऑनलाईन । पूर्वी लोक गर्भपात करून गर्भात असलेल्या मुलीला मारून टाकत होते. आता देखील ही परिस्थिती बदललेली नाही, पण ही संख्या कमी प्रमाणात आहे. मुली जन्मल्यावर किंवा गर्भात असतानाच मुलीला मारून टाकल्या जाते. त्यामुळे देशातील मुलींची संख्या कमी होत आहे. मुलींना जन्म दिल्यावर तिचं शिक्षण, तिच्या लग्नासाठी लागणारा हुंडा यामुळे तिला जन्मल्या पूर्वीच मारून टाकले जाते. परंतु आता मुलींची संख्या वाढावी यासाठी सरकारकडून देखील बऱ्याच योजना राबवण्यात येत आहे. जेणेकरून मुलीसाठी पैशाचा खर्च आई-वडिलांच्या डोक्यावरून कमी होईल आणि मुली वाचतील. अशीच एक योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना. (Majhi Kanya Bhagyashree Yojana)

मुलीच्या जन्मानंतर 50,000 रुपये-

माझी कन्या भाग्यश्री योजनेच्या माध्यमातून सरकारकडून मुलीच्या जन्मानंतर 50,000 रुपये दिले जातात. महाराष्ट्र सरकारची ही माझी कन्या भाग्यश्री योजना 1 एप्रिल 2016 पासून सुरू करण्यात आली होती. मुलींची संख्या वाढावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती.

काय आहेत अटी? (Majhi Kanya Bhagyashree Yojana)

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून काही नियम लावण्यात आले आहेत. त्या नियमानुसारच तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकतात. सर्वात पहिले तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी असणे गरजेचे आहे. त्यानंतर या योजनेसाठी आई आणि मुलगी या दोघींचे जॉइंट अकाउंट असणे गरजेचे आहे. हे अकाउंट ओपन केल्यानंतर 1 लाख रुपयांचा दुर्घटना विमा आणि 5 हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट दिल्या जातो. या योजनेंतर्गत राज्यातील ज्या पालकांनी मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत नसबंदी केली, त्यानंतर त्या मुलीच्या नावावर शासनाकडून 50,000 रुपयांची रक्कम बँकेत जमा केली जाते. तसेच जर दोन मुलींच्या जन्मानंतर नसबंदी केली तर दोन्ही मुलींच्या नावावर २५-२५ हजार रुपये दिले जातात.

काय लागतात कागदपत्रे ?

महाराष्ट्र सरकारच्या माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी (Majhi Kanya Bhagyashree Yojana) काही कागदपत्रांची गरज लागते. यासाठी आधार कार्ड, बँक खाते पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट फोटो, निवासी प्रमाणपत्र, इन्कम प्रमाणपत्र या डॉक्युमेंटची गरज भासते.

असा करा अर्ज –

१) माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वात आधी महाराष्ट्र सरकारच्या शासन आधारित वेबसाईटवर जा.
२) त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा. दिलेला फॉर्म संपूर्ण वाचल्यानंतर भरून द्या.
३) त्यानंतर सर्व डॉक्युमेंट अटॅच करून हा फॉर्म महिला आणि बाल विकास मंत्रालयात जाऊन जमा करा.
४) हा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरणे अत्यंत गरजेचे आहे. कारण या अर्जात कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल.