Make In India: आता Eiffel Tower वर मिळणार UPIची सुविधा; तब्बल 11 देश बनलेत वापरकर्ते

Make In India: UPI म्हणजे Unified Payment Interface. ही एक तात्काळ, सुरक्षित आणि सोयीस्कर पेमेंटची पद्धत आहे. UPI द्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातून थेट पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकता. UPI द्वारे पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला खाते क्रमांक, IFSC कोड यासारख्या तपशीलांची आवश्यकता नसते, केवळ तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही पैसे पाठवू शकता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे UPI पूर्णपणे सुरक्षित असल्याने इथे पैश्यांची काळजी करत बसावी लागत नाही. UPI तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरून वापरू शकत असल्याने यात जास्ती वेळ वाया जात नाही. UPIचा सर्वाधिक वापर करून आपण एक विक्रम रचला होताच पण आता, UPI भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय होत आहे. फ्रान्समध्येही UPI वापरण्याची परवानगी देण्यात आल्याने पॅरिसमधील Eiffel Tower हे UPI स्वीकारणारे पहिले ठिकाण बनले आहे.

UPIच्या वापरासाठी फ्रांसची मान्यता: (Make In India)

फ्रान्समध्ये UPI ला मान्यता मिळाली आहे, याचा अर्थ तुम्ही आता UPI द्वारे Eiffel Towerचे तिकीट खरेदी करू शकता. हे फ्रान्समधील पहिले ठिकाण आहे जिथे UPI चा वापर सुरू करण्यात आला आहे. UPI ही भारतातील एक लोकप्रिय डिजिटल पेमेंट पद्धत आहे, जी तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी थेट जोडते आणि तुम्हाला QR कोड स्कॅन करून किंवा फोन नंबर टाकून त्वरित आणि सुरक्षितपणे पैसे पाठवण्याची आणि प्राप्त करण्याची सुविधा देते.

लक्ष्यात घ्या केवळ भारतातच नाही तर तब्बल 11 देशांमध्ये आता तुम्ही UPI वापरून पेमेंट करू शकता(Make In India). जगभरातील फ्रान्स, UAE, भूतान, सिंगापूर, नेपाळ, UK, ओमान, जपान, मलेशिया, दक्षिण पूर्व आशिया आणि युरोपमधील अनेक देशांमधून UPI ला मान्यता मिळाली आहे आणि हीच वाढती प्रचलितता पाहता भविष्यात आणखी अनेक देशांमध्ये UPI द्वारे पेमेंट करता येण्याची शक्यता आहे.