Maldives China Relation : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादविवाद सुरु आहेत. मालदीवमधल्या तीन मंत्र्यांनी भारताच्या पंतप्रधानांच्या विरोधात टिपण्णी केल्यामुळे भारतात मालदिवविरुद्ध सोशल मीडिया अभियान सुरु झाले, परिणामी अनेक ट्रॅव्हल कंपन्यांनी मालदीवला जाणाऱ्या ट्रिप्स रद्ध केल्या आणि मालदीवच्या अर्थव्यवस्थेला याचा जबर फाटकाच बसला. मात्र दोन देशांमध्ये झालेला हा वाद पहिलाच नाही, आणि भारत आणि मालदीव काही मित्र देश नाहीत. कारण त्यांनी मागे झालेल्या मतदानातून India Out चे नारे लावत भारताप्रती असलेली भूमिका स्पष्ट केली होती. तसेच चीन आणि भारत यांच्या मध्ये देखील मैत्रीचे नाते नाही. भारत आणि मालदीव यांच्यात वाद सुरु असताना मालदीवच्या राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जूनी यांनी चीनमध्ये जात शी जिनपिंग यांची भेट घेतली होती, आणि या भेटीमुळे दोन्ही देशांची मैत्री जगासमोर आली होती. पण चीनच्या बाजूने हि नेमकी मैत्रीच आहे की काय हे आज जणून घेऊया..
चीनचा नेमका प्लॅन काय? (Maldives China Relation)
खरं तर चीनला हिंद महासागरावर कब्जा करायचा आहे, म्हणूनच त्यांनी मालदीवला एका मोहऱ्याप्रमाणे वापरायला सुरुवात केली आहे. मालदीवला debt trap मध्ये अडकवून चीन स्वतःचा फायदा शोधाताना दिसतोय, आत्ताच्या घडीला मालदीवच्या डोक्यावर असलेलं चीनचं कर्ज शिगेला जाऊन पोहोचलं असल्याने इंटरनेशनल मॉनिटरी फंडने त्यांना येणाऱ्या संकटांबद्दल महिपती दिली आहे. चीन कडून खेळली गेलेली कि खरं तर सर्वात जुनी खेळी आहे, चीन इतर देशांना सुरुवातीला मदतीचा हात देऊ करते, मात्र नंतर समोरच्या देशाला कर्जबाजारी करून त्यांच्याकडून स्वतःची इच्छा पूर्ण केली जाते.
ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालानुसार मालदीवच्या एकूण कर्जापैकी 60 टक्के कर्ज हे चीनकडून घेतले गेले आहे. IMFच्या म्हणण्यानुसार, आत्ता मालदीवच्या डोक्यावर चीनचे 1.37 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. सरकारशिवाय मालदीवमध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक 1.37 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली आहे. मालदीवमध्ये पायाभूत सुविधा आणि उत्पादन क्षेत्रातही चीनची मोठी गुंतवणूक आहे.
ब्लु इकॉनॉमीचे अमिश दाखवून मालदीवची फसवणूक:
सध्या चीन मालदीवला ब्लु इकॉनॉमीचे(Blue Economy) आमिष दाखवत आहे. आता ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय? म्हणजेच समुद्र किंवा आजूबाजूच्या परिसरात होणारे आर्थिक व्यवहार. ब्लू इकॉनॉमीमध्ये मत्स्यपालन, तेल, खनिज उत्पादन, शिपिंग आणि सागरी व्यापार, पर्यटन उद्योग यांचा समावेश होतो. चीनला आपल्या विस्तारवादी धोरणाने मालदीवला ब्लु इकॉनॉमीच्या जाळ्यात अडकवून हिंद महासागरावर आपले नियंत्रण वाढवायचे आहे. मात्र मालदीव या सर्व रणनीतील मैत्री समजत असल्याने त्याची फसवणूक होत आहे.
2022 मध्ये मालदीव आणि चीनमधील व्यापारी संबंध(Maldives China Relation) सुमारे 451.29 दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचले, यामध्ये मालदीवने 60,000 डॉलर्सची निर्यात केली, तर चीनची निर्यात केवळ 451.29 दशलक्ष डॉलर्स एवढीच होती. सध्या मालदीवमध्ये चीनची उपस्थिती वाढत आहे. जागतिक व्यापार आणि पायाभूत सुविधांचे नेटवर्क तयार करण्यासाठी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह(Belt and Road Interventions) अंतर्गत, चीनने मालदीवमधल्या वेलाना आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार केला आहे, तसेच तिथे क्रॉस-सी चीन-मालदीव मैत्री पूल बांधण्यात आलाय. एवढेच नाही तर चीनच्या नॅशनल मशिनरी इंडस्ट्री कॉर्पोरेशनने(National Machinery Industry Corporation) मालदीवच्या पर्यटन क्षेत्रात 140 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.