Mamaearth IPO ठरतोय पैश्याचे मशीन; शिल्पा शेट्टीला सुद्धा झाला मोठा फायदा

Mamaearth IPO : Mamaearth चा IPO हा काही प्रमोटर्ससाठी पैसे छापण्याचे मशीन बनला आहे. यात सर्वात आधी शिल्पा शेट्टी यांचे नाव आले आहे. असं म्हटलं जातंय कि शिल्पा शेट्टी यांनी करोडो रुपयांची कमाई केली आहे. या व्यतिरिक्त कंपनीसोबत सहा वर्षांपासून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना आता जबरदस्त फायदा होणार आहे. Honasa Consumer च्या दोन सुरुवातीच्या दोन गुंतवणूकदारांना 100 पट फायदा होऊ शकतो आणि या बातमीमुळे आता पूर्ण बाजार हादरून गेला आहे.

कोण आहेत कंपनीचे मोठे गुंतवणूकदार: Mamaearth IPO

स्नॅपडीलचे सह-संस्थापक कुणाल बहल आणि रोहित कुमार बन्सल, या दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी ऑगस्ट 2017 मध्ये मामाअर्थ कंपनीमध्ये केवळ 3.21 रुपये प्रति शेअर या सरासरी किमतीत हिस्सा विकत घेतला होता आणि आज त्या शेअर्सची किंमत 324 झाली आहे. त्यामुळे आता दोन्ही गुंतवणूकदारांना 38.27 कोटी रुपयांचा परतावा मिळू शकतो. आता हे दोघे IPO मध्ये 38.66 कोटी रुपयांना विकत आहेत, ज्यामध्ये OFS देखील समाविष्ट असेल.

यामध्ये केवळ कुणाल बहाल आणि रोहित बन्सल यांचाच समावेश नसून इतर प्रमोटर्सचा समावेश आहे, आणि विशेषतः यात शिल्पा शेट्टी कुंद्रा यांचे नाव समोर आले आहे. त्या 13.9 लाखांना आपले शेअर्स विकणार आहेत, त्यांनी जेव्हा हे शेअर्स विकत घेतले तेव्हा शेअर्सची किंमत केवळ 41.86 रुपये प्रती शेअर होती.यामुळे आता शिल्पा शेट्टी यांना तब्बल 674 टक्के नफा मिळणार आहे.

IPO नंतर कंपनी होणार मालामाल:

मामाअर्थ कंपनीने आपला IPO जाहीर केल्यानंतर कंपनीचे मार्केट कॅप 10,425 कोटी होऊ शकते. एकूण IPO मधल्या 1,701.44 कोटींपैकी OFS 1,336.44 कोटी रुपये आहे तर नवीन इश्यू 365 कोटी रुपये आहे. त्यामुळे IPO जाहीर केल्यानंतर कंपनी मालामाल होणायचे पूर्ण संकेत दिसत आहेत. कंपनीतील गुंतवणूकदार, प्रमोटर्स आणि स्वतः कंपनी भरपूर पैसे कमावणार आहे.