Mango Price: आंबा हे जगभरातील सर्वांचे आवडते फळ आहे आणि उन्हाळ्यात त्याची मागणी खूप जास्त असते. मात्र, यंदा आंबा खरेदी करण्यासाठी ग्राहकांना खिशातून अधिक पैसे मोजावे लागतील, कारण बदलत्या हवामानामुळे आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
आंब्याच्या किमती वाढण्याचे कारण काय? (Mango Price)
फेब्रुवारी महिन्यात आंब्याच्या झाडांना मोहोर येतो, परंतु यावर्षी हवामानातील बदलामुळे तसे घडले नाही. याचा परिणाम म्हणून आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. Central Institute of Subtropical Horticulture चे शास्त्रज्ञही हवामान आणि आंबा पिक यांच्यातील संबंधावरून चिंतित आहेत. मार्चचा पहिला आठवडा आंबा पिकासाठी महत्त्वाचा असतो. या काळात झाडांना मोहोर आला नाही तर उत्पादनात आणखी घट होण्याची शक्यता असते, त्यामुळे आंब्याच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे.
किंमत वाढीचा खिश्यावर परिणाम:
वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात सतत चढ-उतार होत आहे. अवकाळी पावसामुळे किमान तापमानातही वाढ होत नाही, यामुळे आंब्याच्या झाडांना मोहोर येण्यास विलंब झाला आहे. सध्या केवळ 10 टक्के झाडांनाच मोहोर आलेला असल्याने, तर 90 टक्के झाडे अद्याप उघडी आहेत(Mango Price). याउलट दक्षिण भारतात मात्र आंब्याचे पीक चांगले आहे. हवामान बदलाचा परिणाम थेट पिकांवर होत असल्याने यावर्षी आंब्याची आवका कमी होण्याची शक्यता आहे. परिणामी, आंब्याच्या गोडीसाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागतील.