March Rule Changes: फेब्रुवारी महिन्याचा शेवट जवळ येत आहे आणि 1 मार्चपासून अनेक महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. नवीन महिन्यात होणारे बदल कोणते हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे कारण हे बदल थेट सामान्य नागरिकांवर परिणाम करतील. मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे, हा महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला काही बदल होतात. याआधी फेब्रुवारी महिन्यातही अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले होते, आणि आता मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून नवीन बदल लागू होणार आहेत.
मार्च महिन्यात होणारे बदल खालील प्रमाणे: (March Rule Changes)
LPG सिलिंडरच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या तारखेला बदलतात. 1 फेब्रुवारीला तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडर महाग केले, पण घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाला नाही. आता पुन्हा गॅस सिलिंडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्याच्या पहिल्या तारखेपासून GSTशी संबंधित काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. या बदलांमुळे 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना E-Invoice शिवाय E-Way Bill जनरेट करता येणार नाही (March Rule Changes). GST नियमानुसार, राज्यांत 50 हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू विकल्या जात असल्यास व्यापार्यांना E-Bill आवश्यक असते आणि आता 1 मार्चपासून ई-चालानशिवाय E-Bill जनरेट करता येणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या क्रेडिट कार्डच्या किमान देय रक्कम (MD) गणना पद्धतीत बदल केले आहेत. हे बदल 15 मार्चपासून लागू होतील आणि SBIने सर्व क्रेडिट कार्डधारकांना ईमेलद्वारे याबद्दल माहिती दिली आहे. सर्वात शेवटी पण मार्च महिन्यात होणारा सर्वात मोठा बदल म्हणजे Paytm. RBIने Paytm पेमेंट बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली असल्याने 15 मार्च 2024 नंतर कोणीही नवीन व्यक्ती Paytm पेमेंट बँकेत खाते उघडू शकणार नाही.