Marketing Strategy । एखादा व्यवसाय सुरु केला तर तर त्याचा खप होण्यासाठी योग्य मार्केटिंग करता आलं पाहिजे. तुमच्या आजूबाजूला असे अनेक व्यवसाय असतील पण ते मागे राहतात ते केवळ मार्केटिंग करता न आल्यामुळे. तुम्ही नक्की कोणता व्यवसाय करता, या व्यवसायासाठी तुमचा ग्राहक वर्ग कोणता आहे आणि यासाठी कोणती मार्केटिंग पद्धत (Marketing Strategy) योग्य ठरेल हि सर्व माहिती असणं फारच महत्वाचं आहे. हे जग फारच स्पर्धात्मक आहे, तुम्ही जर का नीट व्यवसायाची आखणी केली नाहीत तर बाकी स्पर्धक तुम्हाल अगदी सहज बाजूला सारून पुढे निघून जातील.
मार्केटिंग म्हणजे काय आणि ते का करावं?
सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर मार्केटिंग म्हणजे आपल्या उत्पादनाची विक्री करणे. तुमच्या उत्पादनासाठी ग्राहकवर्ग कोणता आहे आणि त्यांच्या गरजा काय आहे हे ओळखून त्या तुमच्या उत्पादनातून त्या पूर्ण करणे. मार्केटिंग म्हणजे आपला फायदा होण्यासाठी बाजाराची गरज ओळखून वावरणे होय. सगळ्यात सोप्प उदाहरण म्हणजे जाहिरात, जाहिरातींना आपण मार्केटिंगचं एक योग्य साधन म्हणू शकतो (Marketing Strategy).
मार्केटिंगच्या बाबतीत 7Ps भरपूर प्रसिद्ध आहेत, यांत Product, Price, Place, Promotion, People, Process आणि Packaging and Promotion यांचा समावेश होतो. आपण कोणत्या उत्पादनाची विक्री करणार आहोत, किती रुपयांत करणार आहोत, कुठे आणि कोणासाठी करणार आहोत, त्याचं पेकेजिंग कसं असेल अश्या गोष्टींचा समावेश होतो.
मार्केटिंगचे प्रकार कोणते (Marketing Strategy)
मार्केटिंगचा आवाका किती मोठा आहे हे त्याच्या प्रकारांवरून लक्षात येतं. Marketing Strategy म्हणजे आपल्या ग्राहकांना आपल्या उतपादानाजवळ आकर्षित करण्यासाठी वापरलेल्या पद्धत्ती. मार्केटिंग म्हटलं आपल्या समोर उभं राहणारं चित्र म्हणजे सोशल मिडिया मार्केटिंग. पण तुम्हाला माहिती आहे का, मार्केटिंग करण्याचा हा एकाच प्रकार नाही. मार्केटिंगचे अनेक प्रकार आहेत, ते कोणते हे पाहूयात.
१) इंटरनेट मार्केटिंग:
सध्या सगळीकडे चर्चेत असलेला विषय म्हणजे इंटरनेट मार्केटिंग, आणि सोशल मिडिया हा त्याचाच एक भाग आहे. कमी खर्चात अनेक लोकांपर्यंत पोहोचणारा हा प्रकार आहे. सोशल मिडिया, ई-मेल,ब्लॉगिंग इत्यादी साधनं वापरून इंटरनेट मार्केटिंग केलं जातं.
२) B2B मार्केटिंग:
इथे एका कंपनीने तयार केलेले उत्पादन दुसऱ्या कंपनीला विकले जाते. हि पद्धत काहीशी B2C सारखी आहे आहे, पण काही पाधात्तींमध्ये फरक दिसून येतात.
३) कोन्टेस्ट मार्केटिंग:
सोशल मिडियाच्या काळात तुम्ही फेसबुक किंवा इतर Platform अश्या स्पर्धा पहिल्या असतील. यामुळे कंपनीला ग्राहकांना आपल्याजवळ आकर्षित करण सोपं जातं. अनेकवेळा विविध व्यवसाय अश्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून आपल्या ग्राहकांना आपल्याजवळ खेचतात.
४) ब्रॅंडिंग :
ब्रॅंडिंग म्हणजे ग्राहकांच्या मनात आपली सकारात्मक ईमेज तयार करणे. यामध्ये कंपनीचा लोगो, टॅगलाईन, टोन इत्यादींचा समावेश होतो. तुमच्या ग्राहकांना विश्वास बसला पाहिजे कि बाजारात एखाद्या उत्पादनासाठी तुम्हीच सर्वात योग्य आहात.
हे काही प्रकार आम्ही इथे नमूद केलेलं असले तरीही मार्केटिंगचे प्रकार याहून अधिक आहेत. तुमचे उत्पादन कोणते आहे आणि कोणते ग्राहक तुमच्यासाठी महत्वाचे आहेत हे जाणून योग्य त्या पद्धत्तीचा वापर करून आपला व्यवसाय मोठा करा. .