बिझनेसनामा ऑनलाईन । आजच्या महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत, तसेच नाव कमवत आहेत. कितीही म्हटलं तरीही घरची आणि कामाची अश्या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण हे कठीणच. त्यात झालेल्या बाळाची गैरसोय न होऊ देता आपलं घर आणि काम दोन्ही सांभाळण म्हणजे एका बाईची तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. मात्र आई होण हे कुठल्याही बाईसाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट असते. जेवढा वेळ आपण कामात घालवतो तेवढा आपल्या बाळासोबत घालवावा असं प्रत्येकीला वाटत असत. या एकूण सर्व पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कंपनी महिंद्रा आणि महिंद्राकडून (Mahindra & Mahindra) महिला कर्माचारी वर्गाला गरोदरपणात दिल्या जाणाऱ्या प्रसूती रजेत काही बदल करण्यात आले आहेत.
महिंद्रा आणि महिंद्रा हि एक खासगी कंपनी आहे, जिने हल्लीच महिला कर्माचार्यांसाठी नवीन प्रसूती धोरण आणले आहे (Maternity Leave).हे धोरण केवळ ऑफिस मध्ये काम करणाऱ्यांपर्यंत सीमित नसून, कंपनीच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांचा सुद्धा यात समावेश केला जाईल. काही महिला या प्रसूतीसाठी सक्षम नसतात, किंवा त्यांना इतर काही अडचणींमुळे गर्भ धारण करणे शक्य होत नाही. अश्यावेळी सरोगसी केली जाते किंवा मुल दत्तक घेतलं जातं. नैसर्गिकपणे आई न झाल्या तरीही बाळाची योग्य काळजी घेता यावी व पूर्णवेळ त्याच्यासोबत राहता यावा म्हणून या महिलांना देखील रजा दिली जाते.
पाच वर्षांची Maternity Leave :
महिंद्रा आणि महिंद्राकडून गरोदर महिलांसाठी प्रसूती रजेचा कालावधी ठरवण्यात आला आहे. ज्यात सहा महिन्यांसाठी महिलेला Flexible Working Hours दिले जातील. तसेच २४ महिने म्हणजेच तब्बल दोन वर्षांसाठी हायब्रीड कामाचा पर्याय दिला जाईल. इथे एक पूर्ण आठवडा महिलेच्या प्रसूती काळासाठी सक्तीचा करण्यात आला आहे, या काळात महिलेचे शरीर आणि मन दोघांनाही आरामाची गरज असते तसेच जन्मलेल्या बाळासाठी आईचा सहवास हाच सगळ्यात महत्वाचा असतो. या गोष्टींची दाखल घेत हा आठवडा रजा सक्तीची करण्यात आली आहे.
पुढे मुलाची देखरेख करू पाहणाऱ्या महिलांसाठी १ वर्षाची बिनपगारी रजा उपलब्ध आहे, पण यासाठी तुम्ही कंपनीसाठी 36 महिने काम केल्याचा रेकोर्ड असणं अनिवार्य आहे. महिलांना त्यांच्या प्रसूती काळात होईल तेवढा पाठींबा देण्याचा प्रयत्न कंपनी करत आहे, महिलांचा विचार करत अधिकाधिक महिलांना कामाची संधी उपलभ व्हावी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसूती नंतर कामावर पुन्हा येणाऱ्या महिलांसाठी करिअर इन्शुरन्स पोलिसी देखील कंपनीकडून देण्यात येणार आहे.