Medicine Rate: रुग्णांसाठी दिलासादायक बातमी; देशात 100 औषधं होणार स्वस्त

Medicine Rate: वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने रुग्णांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या आदेशानुसार राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (NPPA) ने 69 नवीन औषधांच्या किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत, यामुळे रुग्णांना या औषधांवर खर्च करण्यासाठी आता कमी पैसे मोजावे लागतील. सरकारच्या नवीन निर्णयानुसार Cholesterol, मधुमेह, ताप, संसर्ग, अतिरक्तस्त्राव, Calcium, Vitamin-D, लहान मुलांची Antibiotics यांसारख्या अनेक औषधांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत.

औषधे स्वस्त, रुग्णांना दिलासा: (Medicine Rate)

देशात वैद्यकीय उपचारांचा खर्च वाढत असल्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा वाढत आहे. हा वाढलेला खर्च आपण सगळ्यांनीच अनुभवला असून यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने 100 औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारने औषधांच्या किंमती कमी करण्याच्या निर्णयातून रुग्णांना मोठा दिलासा मिळणार हे मात्र नक्की. फेब्रुवारीच्या सुरुवातीला औषधांच्या किंमतीत कपात झाल्यानंतर आता पुन्हा एकदा किंमती कमी करण्यात आल्या आहेत. नवीन निर्णयानुसार आता नवीन पॅकिंगवर सुधारित दर दर्शविले जातील आणि डीलर नेटवर्कला नवीन किंमतींची माहिती देण्यात येईल.

जसं की आपण सगळेच जाणतो आपला भारत देश हा अनेक अंशी सामान्य नागरिकांचा देश आहे (Medicine Rate). गेल्या काही वर्षांमध्ये कोरोना महामारीनंतर औषधांच्या किंमती आणि वैद्यकीय खर्चात लक्षणीय वाढ झाली होती आणि यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढला होता, याच पार्श्वभूमीवर सरकारने औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.