Mera Bill Mera Adhikar : 1 कोटी जिंकण्याची सुवर्णसंधी; सरकारने आणली जबरदस्त योजना

बिझनेसनामा ऑनलाईन । भारत सरकार नेहमीच काही ना काही ना नवीन योजना (Mera Bill Mera Adhikar) ह्या नागरिकांसाठी अंमलात आणत असते. मग ते शेतकरी असो किंवा नोकरदार प्रत्येकाला काही ना काही ना फायदा हा होतोच. आता ह्यातच भारत सरकारने ‘मेरा बिल मेरा अधिकार’ ही योजना सुरु केली आहे. जीएसटी बिलाचा कल वाढवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असून ह्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला करोडपती होण्याची संधी आहे. ते कसे ते जाणून घेऊ.

काय आहे ही योजना– Mera Bill Mera Adhikar

किरकोळ आणि घाऊक व्यापारी जीएसटी बिलाचा वापर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मेरा बिल मेरा अधिकार’ बीजक प्रोत्साहन योजना 1 सप्टेंबरपासून सुरु केली आहे. देशातील सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना सुरू होणार असून यामध्ये आसाम, गुजरात, हरियाणा या राज्यांचा आणि आणि पुद्दुचेरी, दादरा नगर हवेली आणि दीव- दमण या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ म्हणजेच CBIC ने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. ही योजना जीएसटी इनव्हॉइस अपलोड केल्यावर रोख बक्षिसे मिळवून देते.

कशी असतील ही बक्षीसे

वस्तू आणि सेवा कर (GST) नोंदणीकृत पुरवठादारांकडून ग्राहकांना जारी केलेले सर्व चलन ‘मेरा बिल मेरा अधिकार’ योजनेसाठी (Mera Bill Mera Adhikar) पात्र असतील. या योजनेच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) बिल दर महिन्याला अपलोड करणाऱ्यांपैकी ८०० लोकांना १०,००० रुपयांचे बक्षीस दिले जाईल. यासोबतच अशा 10 जणांची देखील निवड केली जाईल ज्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल. दुसरीकडे, बंपर बक्षीसाबद्दल बोलायचे तर ते तिमाही आधारावर काढले जाईल. या बंपर रिवॉर्डचा लाभ तिमाहीत अपलोड केलेल्या कोणत्याही बिलाच्या सहभागी व्यक्तीला दिला जाऊ शकतो.

असा घ्या लाभ –

या योजनेचा लाभ घेण्यासाठी मेरा बिल मेरा अधिकार अॅप डाउनलोड करा किंवा तुम्ही अधिकृत वेबसाईट web.merabill.gst.gov.in ला देखील भेट देऊ शकता

तुम्ही कमीत कमी 200 रुपयांचे बिल येथे अपलोड करू शकता.

ऍपवर अपलोड केलेल्या इनव्हॉइसमध्ये विक्रेत्याचा जीएसटीआयएन, इनव्हॉइस क्रमांक, भरलेली रक्कम आणि कराची रक्कम असावी.

या योजनेची संकल्पना अशा प्रकारे करण्यात आली आहे की, नागरिक आणि ग्राहकांना वस्तू किंवा सेवांची खरेदी व्यवसाय-ते-ग्राहक (B2C) करताना विक्रेत्याकडून खऱ्या पावत्या मागण्यासाठी प्रोत्साहन मिळावे.