Microsoft ने 1000 कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; आर्थिक मंदीचे सावट?

बिझनेसनामा ऑनलाईन । सध्या संपूर्ण जगात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक कंपन्या गेल्या वर्षभरापासून आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देत असल्याच्या बातम्या आपण यापूर्वीच ऐकल्या असतील. त्यातच आता जगातील प्रसिद्ध कंपनी Microsoft ने आपल्या १००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विक्री आणि ग्राहक सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. येव्हडच नव्हे तर कंपनी जवळपास 10,000 जणांना यावर्षी बाहेर करणार असल्याच्या चर्चाही सुरु आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, Microsoft ने एका वर्षात 10,000 लोकांना कामावरून काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने हेडकाउंट 1,000 ने कमी करून नोकर कपातीला सुरुवात सुद्धा केली आहे. कंपनीकडून विक्री आणि ग्राहक सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. कंपनीने काही कर्मचाऱ्यांना ग्राहक समाधान खाते व्यवस्थापन या संघात ऍड केले तर बऱ्याच जणांच्या आहे त्या नोकऱ्या काढून घेतल्या. याचा सर्वाधिक फटका ग्राहक सेवेशी संबंधित कर्मचाऱ्यांवर बसला आहे. मात्र इंजिनिअर, प्रकल्प व्यवस्थापक आणि पणन विभागातील कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी करण्याचा फटका बसला आहे.

यापूर्वीही कंपनीने अनेकांना दिला नारळ- Microsoft

मागच्या महिन्यामध्ये Microsoft कंपनीने 276 कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. त्यापैकी बरेच जण ग्राहक सेवा समर्थन आणि विक्री संघातील होते. नोकरीमध्ये करण्यात आलेल्या या कपातीमुळे इंजीनियरिंग आणि विपणन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने मे महिन्यात सुद्धा वॉशिंगटन राज्यातील 158 नोकऱ्या कमी केल्या होत्या. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला नोकऱ्यांमध्ये करण्यात येणाऱ्या कपातीच्या घोषणेचा परिणाम सिएटल क्षेत्रातील 2700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांवर झाला होता.