Minor Demat Account: आजच्या जगात तुम्ही गुंतवणुकीचे अनेक पर्याय पहिलेच असतील, पैकी शेअर बाजाराचे गुंतवणूक करण्याकडे अनेक जणं आकर्षित होताना दिसतात. गुंतवणुकीचा एक साधा आणि सोपा नियम आहे, तो म्हणजे जिथून जास्ती परतावा तिथे गुंतवणूक. आजकाल अधिकाधिक चर्चा केली जाते ती डिमॅटची, मात्र कधी लहानमुलांच्या डिमॅट अकाउंटबदल माहिती मिळवली आहे का? हो!! तुम्ही एकदम खरी बातमी वाचत आहात. तुमची मुलं डिमॅट अकाउंट सुरू करू शकतात, एवढंच नाही तर शेअर बाजारात गुंतवणूक देखील करू शकतात.
लहान मुलांसाठी डिमॅटचे नियम काय? (Minor Demat Account)
आता कोणत्याही वयात मुलांच्या नावावर शेअर बाजार खातं उघडता येतं पण हे लक्षात ठेवा की, ते पूर्णपणे स्वतंत्रपणे चालवता येणार नाही. 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी पालक डिमॅट खाते उघडू शकतात, पण 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मुलं स्वतः या खात्याचा वापर करू शकत नाहीत. पालकांचे मार्गदर्शनाखाली आणि परवानगीनेच मुले गुंतवणूक करू शकतात.
लहान मुलांच्या नावे असलेल्या डिमॅट खात्यातून थेट शेअर्स खरेदी करता येत नाही. भारताच्या करारा कायदा, 1872 नुसार लहान मुलांना आर्थिक व्यवहार करण्याचा अधिकार नाही, म्हणून या खात्यावर त्यांच्या पालकांचे पूर्ण नियंत्रण असते. या खात्यातून थेट शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येत नाही. पण मुलांना भेट म्हणून मिळालेले शेअर्स त्याच्या डिमॅट खात्यात ठेवता येतात आणि ते त्याच्याच नावावर असलेल्या “Trading cum Demat account” उघडल्यावर पुढे विकू शकता.
हा अकाउंट कसा उघडाल?
मुलाच्या भविष्यासाठी गुंतवणूक करायची असल्यास आता डिमॅट हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे, इथे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे नोंदणी करू शकता. पालकांनी त्यांच्या नावाला जोडून मुलाच्या नावावर हे खाते उघडता येतं. यासाठी तुमच्या कागदपत्रांची गरज भासेल जसं की पालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी. याशिवाय, ज्या मुलाच्या नावावर खाते उघडतंय त्याचं जन्म प्रमाणपत्र (ज्यावर पालकांचं नावही नोंदलेलं आहे), SEBI KYC आणि मुलाचं बँक खातेही लागेल.
मुलाचे डिमॅट खाते उघडण्यासाठी त्याच्यासोबत पालकांचेही कागदपत्रं लागतात. या प्रक्रियेत ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सही करता येते. मुलाचा फोटो आणि पालकांचे फोटो देखील डिमॅट खात्यात अपलोड करायचे असतात(Minor Demat Account). नियमनुसार, पालक आणि मुलं दोघांनाही KYC, PMLT आणि FATCA पूर्ण करणे बंधनकारक आहे.