बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर बाजारात कधी कुठला शेअर तेजीत येईल आणि गुंतवणूकदारांना मालामाल करेल हे सांगता येत नाही. काही शेअर्स खूपच कमी वेळेत हिरव्या रंगात जातात आणि गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतात तर काही शेअर्समुळे नुकसानही होते. आज आम्ही अशाच एका शेअर्सबद्दल तुम्हाला सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. एमके व्हेंचर्स कॅपिटल (MKVentures Capital Share) असं या शेअर्सचे नाव असून या शेअरने 19 वर्षात तब्बल 43,000 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे.
43,000 टक्के रिटर्न – (MKVentures Capital Share)
कोविड काळात अनेक कंपन्यांचे शेअर्सच्या किंमती घसरलेल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी ज्यांनी ज्यांनी डोकं लावून आणि शेअर मार्केटचा अभ्यास करून योग्य गुंतवणूक केली ते सर्वजण आज मालामाल झाले आहेत. एमके व्हेंचर्स कॅपिटलच्या शेअर्सने तर आधीपासूनच गती घेतलेली आहे. 2004 मध्ये या कंपनीचा स्टॉक 2.50 रुपयांना उपलब्ध होता आणि आज त्याची किंमत 1113 रुपये आहे. म्हणजेच 19 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 43,000 टक्के रिटर्न मिळवून दिला आहे.
एवढेच नाही तर या वर्षी मे महिन्यात या शेअरने 1584 रुपयांचा उच्चांक गाठला. जर एखाद्या व्यक्तीने 19 वर्षांपूर्वी या कंपनीचे 1 लाख रुपये किमतीचे शेअर्स खरेदी केले असते तर आज त्याच शेअर्सची किंमत 4 कोटी 36 लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती. 1 लाख तर सोडाच पण जर त्यावेळी तुम्ही MKVentures Capital च्या शेअर्समध्ये 25,000 रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज तुमच्याकडे 1 कोटी रुपये जमा झाले असते.