बिझनेसनामा ऑनलाईन । Airtel, Jio, Vodafone Idea च्या ग्राहकांना मोठा आर्थिक झटका बसणार आहे. दूरसंचार कंपन्या या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या रिचार्ज प्लॅनचे (Mobile Recharge) दर वाढवू शकतात. एका अहवालांनुसार, या सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि 5G स्पेक्ट्रमची किंमत वसूल करण्यासाठी ARPU वाढवू शकतात त्यामुळे ग्राहकांना आता मोबाईलचा आनंद घेणं परवडणारे नक्कीच नसेल.
ARPU 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता- (Mobile Recharge)
जागतिक एजन्सी CIRSIL रेटिंग्सने केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील टेलिकॉम कंपन्या या वर्षाच्या शेवटी ARPU 8 ते 10 टक्क्यांनी वाढवू शकतात. रिपोर्टनुसार, टेलिकॉम कंपन्यांचा ARPU या वर्षाच्या अखेरीस 190 रुपयांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. टेरिफ प्लॅनचे दर वाढवून, कंपन्या त्यांचा त्यांच्या नफ्यात 15 ते 18 टक्क्यांची वाढ करू शकतात.
काही दिवसांपूर्वीच Airtel आणि Vi ने ARPU 200 रुपयांपर्यंत वाढवण्याचा विचार करत असं म्हंटल होते. देशात अनेक ठिकाणी 5G सेवा सुरू झाली असली तरी रिचार्ज प्लॅनच्या दरात (Mobile Recharge) कोणतीही वाढ पाहायला मिळाली नव्हती. Airtel आणि Jio ने आपले रिचार्ज प्लॅन जैसे थे ठेवलेत. आणि आपल्या यूजर्सना अनलिमिटेड 5G इंटरनेट डेटाची सुविधा देत आहेत.
भारतात मोबाईल आणि इंटरनेट डेटाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्यामुळे सर्वच टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे जास्तीत जास्त आकर्षक करण्यासाठी त्यांच्या यूजर्सना अधिक डेटा देण्यासाठी नेटवर्क अपग्रेड करत आहेत, ज्यामुळे त्यांना नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जवळपास 90,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल