Mohan Yadav Net Worth : आपल्या देशात मोठमोठाले अभिनेते, अभिनेत्री, उद्योगपती तसेच क्रिकेटपटूंना वगळता जर का कोणी खोऱ्याने श्रीमंती ओढत असेल तर ते आहेत देशातील राजकीय नेते . हल्ली भारतात सगळीकडेच मतदानाचा वारं वाहत असल्यामुळे आपण पुन्हा एकदा आपल्या मंत्री महोदयांची नेमकी संपत्ती किती आहे याचा कुठेतरी आढावा घेऊ लागलोय. मध्य प्रदेशात निवडणूक जिंकल्यानंतर मोहन यादव यांना मुख्यमंत्र्यांच्या पदी विराजमान करण्यात आलंय, तर आज जाणून घेऊया मध्यप्रदेशच्या भाजप सरकारचे नवे सेनापती असलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांची एकूण संपत्ती नेमकं आहे तरी किती?
मध्य प्रदेशातील मुख्यमंत्री कमावतात एवढे रुपये (Mohan Yadav Net Worth):
छत्तीसगड नंतर आता मध्य प्रदेशात नवीन मुख्यमंत्र्यांना कार्यालयाच्या जबाबदाऱ्या सुपूर्त करण्यात आल्या आहेत. भाजपकडून निवडणूक लढवलेल्या डॉक्टर मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर नियुक्त करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील नवीन मुख्यमंत्र्यांनी बीएससी (Bsc), एलएलबी (LLB) आणि पीएचडी (PhD) अशा तीन पदव्या प्राप्त केल्या आहेत. या शिक्षणाच्या जोरावरच आधी मोहन यादव यांनी उच्च शिक्षण मंत्री म्हणून देखील जबाबदारी पार पाडली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक घटकाकडे वळायचं झालं तर त्यांच्या शिक्षणाप्रमाणेच त्यांची आर्थिक बाजू सुद्धा एकदम भक्कम आहे (Mohan Yadav Net Worth). मध्य प्रदेशाचे नवीन मुख्यमंत्री कुणा करोडपती पेक्षा कमी नाहीत. 495 हजार 699 वोट मिळवून विजयी झालेल्या मोहन यादव यांची आर्थिक संपत्ती 42 कोटी रुपयांची आहे.
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशच्या नवीन मुख्यमंत्र्यांजवळ एकूण 42 कोटी रुपयांची संपत्ती आहे. मध्य प्रदेश राज्यातील अनेक श्रीमंत मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव देखील सामील आहे. वर्ष 2018 मध्ये झालेल्या निवडणुकांच्या वेळी मध्य प्रदेश मधल्या मंत्र्यांनी त्यांचे आर्थिक संपत्ती घोषित केली होती ज्यामध्ये सर्वात आधी भूपेंद्र सिंह यांचं नाव पाहायला मिळालं तर त्यांच्या खालोखाल मोहन यादव होते.मोहन यादव यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 42, 04,81,763 एवढी अफाट आहे (Mohan Yadav Net Worth). स्वतः मंत्री यादव यांच्याजवळ 1.41 लाख रोख रक्कम आहे. आपण त्यांच्या वेगवेगळ्या बँकांमधला हिशोब पाहिला तर पत्नीसमवेत बँक खात्यांमध्ये किमान 28,68,044.97 एवढी मोठी रक्कम जमा झालेली आहे.
डॉक्टरेटची पदवी असलेल्या मुख्यमंत्री मोहन यादव यांना गुंतवणूक करण्यात फारच रुची आहे. वरती नमूद केलेली संपत्ती बाजूला सारली तर त्यांनी विविध कंपन्यांमध्ये 6,42,71,317 एवढ्या मोठ्या रकमेची गुंतवणूक केलेली आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बजाज अलायन्स सोबत किमान 30 लाख रुपयांची पॉलिसी जमा केली आहे तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे रिलायन्स निपॉन, बजाज अलायन्स मध्ये 9 लाख रुपयांचा इन्शुरन्स जमा केलेला आहे.