Monetary Policy Decision: नवीन आर्थिक वर्षात RBI पहिला निर्णय घेणार; यावेळी REPO RATE बदलणार का?

Monetary Policy Decision: कर्जदार ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस उद्यावर येऊन पोहोचाल आहे. रिझर्व्ह बँकेची (RBI) व्याजदरावरील घोषणा उद्या 5 एप्रिल रोजी होणार आहे आणि घोषणेमधून कर्ज घेतलेल्यांना EMI मध्ये थोडीशी बचत केली जाईल अशी अपेक्षा केली जात आहे.

सर्वोच्य बँकेचा उद्या निर्णय:(Monetary Policy Decision)

रिझर्व्ह बँकेच्या monitory policy committee (MPC) ची बैठक 3 एप्रिल रोजी सुरु झाली होती. या बैठकीत नवीन आर्थिक वर्षातील पहिल्यांदा धोरणात्मक व्याजदर ठरवली जाणार आहे. तज्ञांच्या अंदाजानुसार उद्याच्या बैठकीत Repo Rate (ज्या दराने बँका RBI कडून कर्ज घेतात) सध्याच्या 6.5 टक्के एवढाच ठेवला जाण्याची शक्यता आहे. RBIचा हा निर्णय भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करणार असल्याने अर्थशास्त्रज्ञ, गुंतवणुकदार आणि उद्योजक यांच्याकडून या निर्णयाकडे बारिक निरीक्षण केले जाईल.

Repo Rate मध्ये बदल नाही:

आश्चर्य म्हणजे रिझर्व्ह बँकेने सलग सहाव्या वेळी Repo Rate मध्ये कोणताही बदल केला नाहीत. म्हणजेच, ज्या दराने RBI बँकांना पैसे देते तो दर 6.5 टक्के एवढाच कायम ठेवला गेला आहे. RBI च्या गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील monitory policy committee (MPC) ने हा निर्णय घेतला गेला होता.

या समितीमध्ये शशांक भिडे, अशिमा गोयल, जयंत वर्मा, राजीव रंजन आणि मायकल देबब्रत पात्रा यांचा समावेश होता (Monetary Policy Decision). सरकारने RBI ला आदेश दिला होता की, वार्षिक महागाई 4 टक्के राहावी. फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर 5.1 टक्के एवढा होता, त्यामुळे उद्या सर्वोच्य बँक नेमका काय निर्णय घेते याकडे सर्वांची नजर लागून राहील.