Money Earning Ideas : नोकरी न करता कमवा पैसे; वापरा ‘या’ स्मार्ट ट्रिक्स

Money Earning Ideas । पैसा हे जगण्यासाठी लागणारे सगळ्यात महत्वाचे साधन आहे. ज्याच्या हातात पैसा आहे तोच माणूस या महागाईच्या जगात त्यातल्या त्यात सुखी जीवन जगू शकतो. आज जग बदलत आहे, पैसे कमावण्यासाठी मेहनत करावी लागतेच पण काही अंशी ती कमी झाली आहे बहुतेक. डिजिटल जमान्यात घर बसल्या अनेक गोष्टी करता येतात, यांना आपण स्मार्ट ट्रिक्स असं म्हणूया. आजच्या तरुण पिढीला स्मार्ट जनरेशन म्हटलं जातं, कारण ते कमीत कमी खर्चात आणि कमी मेहनत घेत जास्तीत जास्त फायदा कमवून दाखवतात. आज पैसे कमावण्याच्या अश्याच काही स्मार्ट ट्रिक्स आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

घरबसल्या फोटो काढून मालामाल व्हा- Money Earning Ideas

तुम्ही जर का बाजारात जाऊन भीतीवर लावलेल्या फोटो फ्रेमची किंमत विचारली तर तिचा आकडा सुमारे 3000 रुपयांपर्यंत असेल, मात्र विदेशात अनेक ठिकाणी यांची किंमत थेट 8000 रुपयांपर्यंत जाते. आणि एवढा खर्च करून आपलं घर सजवण्यासाठी हि मंडळी उत्सुक सुद्धा असतात, इंटरनेटच्या काही कडक नियमांमुळे आपल्या आवडीचे फोटो सरळ डाउनलोड करता येत नाही आणि याचाच फायदा आपण करून घ्यायचा आहे. आज तुम्ही जे स्मार्टफोन वापरता त्या अनेक मोबाईल फोन्सचा केमेरा भारीच असतो, चागले फोटो काढायला याची मदत होते. तुम्ही जर का Apple वैगरेचा फोन वापरात असाल तर प्रश्नच उत्भवत नाही कारण त्या फोनवर DSLR केमेरयाच्या दर्ज्याचे फोटो काढण्याची क्षमता असते. तर काय करावं, आपल्या आवडीचे असे काही फोटो काढून एक अनेक प्रकारच्या वेबसाईटवर ते अपलोड करावेत. इथे अनेक लोकं ते पाहतील आणि विकत घेतील, आणि वेबसाईटचे मालक त्याचं कमिशन कापून राहिलेली रक्कम तुमच्या खात्यात जमा करतील.

महिला सुरु करू शकतात हा व्यवसाय :

स्वयंपाकघर म्हणजे महिलांचं आवडीचं ठिकाण. आपल्या देशात अजूनही अनेक गृहिणी आहेत ज्यांच्या जवळ पैसे कमवण्याचं साधन नाही. घरात केलेल्या अनेक खाद्य पदार्थांचे फोटो जगभरात कितीतरी लोकं विकत घेतात. Adobe Stock, Fotolia, Fine Art America यांसारख्या अनेक वेबसाईट ते फोटो अश्या लोकांना विकतात, त्यामुळे मोबाईलच्या कॅमेरावर काढलेले फोटो तुम्हाला घर बसल्या कमाई करण्याची संधी देतात. या कामात 100% प्रोफिट मार्जीन आहे, कारण मोबाईल मध्ये केमेरा आणि इंटरनेट या दोन्ही सुविधा उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या फोटोसाठी किंमत निश्चित करा आणि व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरु करा. एकदाका परदेशात ग्राहकांना तुमच्या फोटोबद्दल आवड निर्माण झाली कि अपोआप आपल्या व्यवसाय वाढवत तुम्ही प्रोफेशनल केमेरा आणि इतर उपकरण विकत घेऊन व्यवसाय (Money Earning Ideas) वाढवू शकता.