Most Luxurious Train : भारतातील या रेल्वेने आयुष्यात एकदा तरी प्रवास करायलाच हवा; Rs 19 लाख तिकीट, नक्की आत असं आहे तरी काय?

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतीय रेल्वेमध्ये अलीकडच्या काही काळात आमूलाग्र बदल होतो आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातही सर्वात आलिशान रेल्वे गाड्यांबाबत माहिती सांगणार आहोत. आयुष्यात अशा आलिशान रेल्वेगाडीने लांब पल्ल्याचा प्रवास करायला हवा. तुम्ही एकवेळ या लक्झरी रेल्वेत बसला कि तुम्हाला पंचतारांकित हॉटेलचाही विसर पडेल. भारतातील सर्वाधिक आलिशान रेल्वे गाड्या कोणत्या मार्गाने धावतात आणि त्यांची तिकिटे किती रुपयांना मिळतात याबाबत आपण खाली जाणून घेऊयात.

Maharaja Express

महाराजा एक्सप्रेस ही देशातील सर्वात लक्झरी ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये महाराजासारख्या सुविधा उपलब्ध असल्याचे या ट्रेनच्या नावावरून कळते. यामध्ये पर्यटकांना बार, बटलर सेवा, रेस्टॉरंट, लक्झरी रूम आणि बाथरूमची सुविधा मिळते. या ट्रेनने तुम्ही दिल्लीहून आग्रा, रणथंबोर, बिकानेर, जोधपूर, उदयपूर, वाराणसी, मुंबई अशा अनेक ठिकाणी जाऊ शकता. याचे वेगवेगळे वर्ग आहेत, ज्याचे भाडे ३.९ लाख रुपयांपासून १९.९ लाख रुपयांपर्यंत आहे. https://www.the-maharajas.com/maharajas/maharajas-express-fare.html

Screenshot 2023 03 21 at 8.42.42 PM e1679413273648

Palace on Wheels

पॅलेस ऑन व्हील्स ही भारतातील दुसरी सर्वात लक्झरी ट्रेन आहे. यामध्ये पर्यटकांना राजवाड्यात असल्याचा अनुभव येतो. यात प्रवाशांच्या सोयीसाठी लक्झरी रूम, रेस्टॉरंट, बार, सलून अशा अनेक सुविधा आहेत. ही ट्रेन राजधानी दिल्लीपासून सुरू होते आणि पर्यटकांना आग्रा मार्गे राजस्थानमधील भरतपूर, जोधपूर, जैसलमेर, उदयपूर, चित्तोडगड, सवाई माधोपूर आणि जयपूरला भेट देते. या ट्रेनचे भाडे ५.९ लाख ते १०.७ लाख रुपये आहे. https://thepalaceonwheels.com/index.html

Golden Rath Train

भारतातील 5 सर्वात सुंदर ट्रेनच्या यादीत गोल्डन रथचे नाव देखील येते. या ट्रेनच्या माध्यमातून प्रवाशांना दक्षिण भारतात जाण्याची संधी मिळते. यामध्ये तुम्ही कर्नाटकातील अनेक शहरांमध्ये सहज प्रवास करू शकता. यासोबतच तुम्हाला केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि गोवा येथे जाण्याची संधी मिळते. या ट्रेनचे भाडे १.९ लाख ते ४.४१ लाख रुपये आहे. https://www.goldenchariot.org/

Buddha Express Train

महापरिनिर्वाण एक्स्प्रेस ही रेल्वेद्वारे चालवली जाणारी एक विशेष पर्यटक ट्रेन आहे जी बुद्धीस्ट सर्किट ट्रेन म्हणूनही ओळखली जाते. ही ट्रेन इतर ट्रेन्सच्या तुलनेत थोडी कमी आलिशान आहे, परंतु यामध्ये तुम्हाला रेस्टॉरंट, मसाज, लायब्ररी, किचन आणि बाथरूमची सुविधाही मिळते. यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये खर्च करावे लागतील. https://www.irctcbuddhisttrain.com/mahaparinirvan-express-train

Deccan Odyssey Train

भारतातील प्रमुख लक्झरी गाड्यांच्या यादीत डेक्कन ओडिसीचे नाव देखील समाविष्ट आहे. या ट्रेनमधून तुम्ही महाराष्ट्र, राजस्थान आणि गुजरातला भेट देऊ शकता. या ट्रेनमध्ये 5 स्टार हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि अनेक लक्झरी डबे आहेत. यामध्ये फिरण्यासाठी तुम्हाला 7.5 लाख ते 11.10 लाख रुपये खर्च करावे लागतील. https://www.deccan-odyssey-india.com

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा – https://www.irctctourism.com/newIRCTC/mobile/index.html