MRF Q3 Results: टायर क्षेत्रातील दिग्गज कंपनी MRF ने आज 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीतील (ऑक्टोबर-डिसेंबर) उत्कृष्ट निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीचा नफा लक्षणीयरीत्या वाढला आहे, आणि नेट प्रॉफिट तर थेट 509.71 कोटी रुपयांवर जाऊन धडकले आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये कंपनीचा शुद्ध नफा 174.83 कोटी रुपये होता.
MRF ने किती केली कमाई: (MRF Q3 Results)
MRF ने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत एकत्रित शुद्ध नफा वाढून 1,685.12 करोड रुपये झाला आहे, तर गेल्या आर्थिक वर्षाच्या समान कालावधीत हा नफा 428.29 करोड रुपये होता. कंपनीने या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत जवळपास 4 पट जास्त नफा कमावला आहे आणि निश्चितच याला एक प्रभावी कामगिरी म्हणाली लागेल. अशी ही वाढ कंपनीच्या भविष्यातील वाढीची शक्यता दर्शवते.
लवकरच जाहीर करणार डेव्हिडन्ट:
कंपनीने नुकतीच तिमाही आणि अर्धवार्षिक आर्थिक परिणाम जाहीर केले आहेत. तिमाही परिणामांनुसार, कंपनीची एकूण उत्पन्न 6,240.08 कोटी रुपये इतके होते, जे मागील वर्षीच्या तुलनेत 9.2 टक्क्यांनी वाढले आहे. अर्धवार्षिक परिणामांनुसार, कंपनीची एकूण उत्पन्न 19,042.88 कोटी रुपये एवढे होते, जी मागील वर्षीच्या तुलनेत 9.8 टक्क्यांनी वाढले आहे.
या चांगल्या कामगिरीच्या आधारावर, कंपनीच्या निदेशक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रति इक्विटी शेअर 3 रुपये (30%) अंतरिम लाभांश घोषित केला आहे. हा अंतरिम लाभांश 4 मार्च 2024 रोजी किंवा त्याच्या नंतर दिला जाईल.