MRF च्या शेअरने रचला इतिहास!! प्रथमच 1 लाखांचा टप्पा पार केला

बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध टायर बनवणारी कंपनी MRF च्या शेअरने मोठा इतिहास रचला आहे. आज मंगळवारी म्हणजेच १३ जून २०२३ रोजी शेअर बाजारात सुरुवातीच्या व्यवहारात MRF च्या शेअरने एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. MRF च्या शेअरमध्ये आज 1.37 टक्क्यांनी वाढ झाली, ज्यामुळे त्याची किंमत १ लाख 300 रुपयांवर गेली.

आज BSE वर हा शेअर 99,500 वर उघडला आणि सकाळच्या सत्रातील व्यवहारात 1,00,300 रुपयांच्या हाय लेव्हल उच्चांक या शेअरने गाठला. MRF च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. अगदी सुरुवातीपासून पाहायचं झाल्यास, 27 एप्रिल 1993 रोजी एमआरएफच्या एका शेअरची किंमत 11 रुपये होती. 2000 साली या शेअरची किंमत एक हजार रुपये होती. तर 2012 मध्ये हाच शेअर 10,000 रुपयांच्या पार तर 2014 मध्ये 25,000 रुपयांच्या पार गेला होता. आणि आता तर थेट एक लाखांचा आकडा कंपनीने गाठला असून कंपनीसाठी हि मोठी उपलब्धी आहे.

आत्ता भारतातील सर्वाधिक किंमत असलेल्या शेअर्समध्ये MRF टॉपला आहे. त्यानंतर हनीवेल ऑटोमेशनचा नंबर लागत असून त्यांच्या शेअर्सची किंमत 41,152 आहे. त्यानंतर पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3M इंडिया, अॅबॉट इंडिया, नेस्ले आणि बॉश यांचा क्रमांक लागतो. MRF च्या शेअर्सची किंमत १ लाखांच्या पार गेली असली तरीही हा स्टोक महागडा ठरत नाही, कारण गुंतवणूकदार मूल्य ते कमाई (PE) किंवा किंमत ते बुक व्हॅल्यू (PE) यासारख्या मेट्रिक्सवर सिक्युरिटीजला महत्त्व देतात.