MRF Share Price : शेअर बाजाराची खरेदी विक्री सुरु असता बुधवारी भारतातील सर्वात मोठ्या स्टॉकने जबरदस्त कामगिरी बजावली होती. अलीकडेच 1 लाखाची पातळी ओलांडलेल्या MRF च्या शेअर्सनी काल व्यवहारात 1.5 लाख रुपयांची पातळी गाठली. MRF हा भारतातील महत्वाचा स्टॉक का? इथे लक्ष्यात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे MRF हा गेल्या अनेक काळापासून देशात सर्वात महाग स्टॉक म्हणून प्रसिद्ध आहे . गेल्या वर्षात जून महिन्यात MRF च्या शेअरची किंमत 1 लाख रुपयांपेक्षाही अधिक झाली होती, म्हणूनच हा भारतातील सर्वात पहिला असा शेअर आहे ज्याची किंमत लाखो रुपयांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरली. कालच MRF च्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे एका शेअरच्या किमतीने 1.5 लाखांची किंमत ओलांडली.
MRFच्या शेअर्सची एकूण परिस्थिती कशी होती?(MRF Share Price)
काल ट्रेडिंग सम्पल्यानांतर MRF चे शेअर्स 1.46 टक्क्यांनी घसरले आणि 1,34,600.05 रुपयांवर बंद झाले. कालच्या संपूर्ण दिवसाच्या व्यवहारात MRF च्या शेअर्सनी 1,50,254.16 चा आकडा गाठला होता. ही कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्च पातळी आहे. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास 1.5 टक्क्यांची वाढ झाली . केवळ एका महिन्यात या सर्वात महागड्या शेअरची किंमत 13 टक्क्यांनी वाढली होती. मागच्या पाच वर्षांचा बाजार पाहिलं अंतर कंपनीने 105 टक्क्यांची मजबुती मिळवली आहे म्हणून सध्या त्यांचे Market Cap 57.270 कोटी रुपये बनले .मात्र लक्ष्यात घ्या की केवळ कालच नाही तर या अगोदर वर्ष 2016 मध्ये MRF ने सर्वात पहिल्यांदा 50 हजार रुपयांची किंमत गाठली होती. आत्ताच्या घडीलाMRF चे शेअर्स 1,37,650.00 वर काम करत आहेत.
वर्ष 2000 मध्ये MRF शेअरची किंमत 1000 रुपये होती, तर 2012 मध्ये हीच किंमत थेट 10,000 रुपयांपर्यंत पोहोचली होती. यानंतर वर्ष 2014 मध्ये या स्टॉकने 25,000 रुपयांचा आकडा गाठला आणि पुढे 2016 मध्ये तो 50,000 रुपयांवर जाऊन पोहोचला. वर्ष 2018 मध्ये 75,000 आणि जून 2022 मध्ये MRF च्या शेअर्सने 1 लाखाचा टप्पा ओलांडला होता आणि यावेळेस MRF च्या स्टॉकने(MRF Share Price) 1.5 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.