Muhammad Yunus Success Story: गरीब लोकांचा मसीहा बनलेले ‘हे’ अर्थशास्त्रज्ञ आहेत तर कोण? का मिळाला त्यांना नोबल पुरस्कार?

Muhammad Yunus Success Story : आज आम्ही तुम्हाला बांगलादेश मधल्या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञा बद्दल माहिती देणारा आहोत. आपल्यापैकी अनेकांना व्यवसाय करण्याची आवड असते मात्र आजकालच्या पिढीला अर्थशास्त्र किंवा त्यात येणाऱ्या घटकांविषयी सखोल अभ्यास करण्यात रुची असलेली दिसून येत नाही. त्यामुळे बांगलादेश मधील या अर्थशास्त्रज्ञा बद्दल नक्की वाचा. मोहम्मद युसून या बांगलादेश मधील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञांना वर्ष 2006 मध्ये नोबल शांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. मोहम्मद युनूस आणि बांगलादेश मधल्या ग्रामीण बँकेला संयुक्त रूपाने हा पुरस्कार मिळाला होता. आपल्या आजूबाजूला अशी अनेक मंडळी वावरत असतात जी त्यांच्या असामान्य कार्यामुळे ओळखले जातात. आपण मात्र कधीच त्यांच्या जीवनप्रवासाकडे लक्ष देत नाही किंवा तो उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत नाही. अर्थशास्त्राला प्रत्येक मनुष्याच्या तसेच प्रत्येक देशाच्या विकासाच्या दृष्टीने आणि जीवन जगण्याच्या बाबतीत एक महत्त्वाचा घटक मानला जातो. त्यामुळे आज जाणून घेऊया या प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाची जीवनकहाणी.

कोण आहेत बांगलादेश मधले मोहम्मद युनूस? Muhammad Yunus Success Story

मोहम्मद युनूस यांचा जन्म वर्ष 1940 रोजी पुर्व बंगालच्या भागात झाला. (आता हा भाग बांगलादेशमध्ये सामावला गेला आहे) त्यांनी ढाका महाविद्यालया मधून अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्सचा अभ्यास पूर्ण केला. यानंतर त्यांच्या हुशारीची दखल घेत त्यांना अमेरिकेमधून फुलब्राईट शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली होती. ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी 1965 ते 1972 या वर्षांमध्ये अमेरिकेमधल्या वंडरबिल्ड युनिव्हर्सिटीमधून राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं, आणि परदेशात शिक्षकेपेक्षा स्वीकारला. मुळातच अर्थशास्त्राची आवड असलेल्या मोहम्मद युसून यांनी वर्ष 1969 मध्ये अर्थशास्त्रामधून पीएचडीची पदवी मिळवली होती.

मोहम्मद युसून यांना गरिबांचा मसीहा असं का म्हटलं जातं?

असं म्हणतात की वर्ष 1974 मध्ये बांगलादेशला दुष्काळाने ग्रासलं होतं. या कठीण काळात सामना केल्यानंतर मोहम्मद युसून यांनी गरीब लोकांच्या आर्थिक परिस्थितीबद्दल अभ्यास करायला सुरुवात केला. आपल्या विद्यार्थ्यांना गावातील शेतांमध्ये जात शेतकऱ्यांची मदत करण्याचा सल्ला दिला. मात्र अभ्यासातून त्यांच्या लक्षात आलं होतं की इथल्या लोकांना पैशांची गरज आहे व पारंपारिक शेतीचा व्यवसाय करून म्हणेल ते उत्पन्न त्यांना मिळणार नाही. म्हणून यांनी ताबडतोब छोटे-मोठे व्यवसाय सुरू करत गरिबांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या होत्या (Muhammad Yunus Success Story).

पुढे वर्ष 1976 मध्ये त्यांनी मायक्रो लो न(Micro Loan) ची सुरुवात केली. मायक्रो लोनच्या अंतर्गत ते बांगलादेश मधील गरीब लोकांना आर्थिक मदत पोहोचवत होते. या योजनेचा फायदा करून घेत देशातील गरीब लोक समूह बनवत त्यांच्याकडून कर्ज घेऊ शकत होते. वर्ष 1983 मध्ये बांगलादेश सरकारने या नियोजनाचे रूपांतर एका ग्रामीण बँक प्रोजेक्ट मध्ये केलं. आज मोहम्मद युसून यांचे माईक्रो क्रेडिट मॉडेल अनेक देशांमध्ये वापरले जात आहे. जगभरातील अनेक लोकांकडून या प्रोजेक्टचं भरभरून कौतुक केलं जातंय. त्यांच्या या समाजाप्रति कार्यासाठी वर्ष 2006 मध्ये मोहम्मद युसून (Muhammad Yunus Success Story) तसेच यांच्या बँकला नोबल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.