बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत. हुरून इंडिया रिच लिस्ट यांनी जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत अंबानी नंबर वन ठरले आहेत. 8,08,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार, अंबानींच्या एकूण संपत्तीमध्ये 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
हुरून लिस्ट मध्ये नेमकं काय म्हंटल आहे? Mukesh Ambani
हुरून लिस्टमध्ये भारतातील अब्जाधीशांची नावं सामावलेली आहेत. लिस्टच्या अहवालानुसार रिलायंस इंडसट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे सर्वात श्रीमंत भारतीय उद्योगपती आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 8,08,700 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दुसऱ्या स्थानावर गौतम अदानीचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 474,800 कोटी रुपयांच्या घरात आहे. अहवाल सांगतो कि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर अदानी यांच्या संपत्तीत 57 टक्क्यांची घसरण झाली आहे. हिडेनबर्ग आपल्या अहवालात अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते ज्यानंतर त्यांचे मार्केट कॅप कमी झाले तसेच त्यांच्या वैयक्तिक संपत्तीची हानी झाली.
अंबानी -अदानी यांच्यानंतर कोणाचा नंबर?
गोपीचंद अहुजा हे लिस्टमध्ये 5व्या स्थानावर आहे, त्यांची एकूण संपत्ती 1,76,500 कोटी रुपये आहे, त्यांच्या या संपत्तीमध्ये एकूण 7 टक्क्यांची सकारात्मक वाढ झाली आहे. सहाव्या क्रमांकावर दिलीप संघवी आहेत ज्यांची एकूण संपत्ती 1,64,300 रुपये आहे, गेल्या वर्षीचे आकडे पहिले तर यात 25% वाढ झालेली आहे. आपल्या संपत्तीत 7% वाढ करत 1,62,300 सह लक्ष्मी मित्तल हे सातव्या क्रमांकावर आहेत तसेच राधाकिशन दमाणी हे 1,43,900 रुपयांसोबत आठव्या क्रमांकावर आहेत. शेवटी कुमार बिर्ला हे 1,25,600 कोटी रुपयांसह नवव्या क्रमांकावर आहेत.