Mukesh Ambani Deal : चीन हा भारताचा नेहमीच प्रतिस्पर्धी देश राहिला आहे, आपण शेजारी देश असलो तरीही दोघांमधले संबंध कधीही चांगले नव्हते, त्यामुळे हिंदी-चिनी भाई भाई म्हटलं तरीही त्यात काहीही तथ्य नाही. चीन नेहमीच त्याच्या शेजारी राष्ट्रांमध्ये गुंतवणूक करून काही गुप्त मोहीम आखात असतो. सध्या चीनला लक्ष्यद्वीप आणि श्रीलंकेत गुंतवणूक वाढवायची आहे. श्रीलंका देश गेल्या कैक दिवसांपासून गरिबीचा सामना करत आहे, आणि या परिस्थितीवर मात करण्यासाठी सध्या श्रीलंका एका मोठ्या टेलिकॉम कंपनीच्या विक्रीच्या तयारीत आहे. भारत हा चीनचा नेहमीच शत्रू असल्याने कायम भारतावर नजर ठेवता यावी म्हणून त्याचे प्रयत्न सुरु असतात, आता देखील भारतावर नजर ठेवण्यासाठी चीनला श्रीलंकेतील कंपनी विकत घ्यायची होती मात्र आता अंबानी मध्ये आल्याने चीनचा डाव फिसकटला आहे.
अंबानींमुळे चीनचा डाव फस्त : (Mukesh Ambani Deal)
चीन प्रमाणेच भारतातील प्रसिद्ध कंपनी रिलायन्सचे मालक म्हणजेच मुकेश अंबानी यांना देखील श्रीलंकेतील टेलिकॉम कंपनी विकत घ्यायची आहे. चीन आणि भारत यांच्यामध्ये मुकेश अंबानी आल्यामुळे चीनचा भारतावर नजर ठेवण्याचा डाव फसला आहे. आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे, अंबानी यांनी श्रीलंकेतील कंपनी विकत घेतल्यास भारतीयांना श्रीलंकेत कॉलिंग आणि डेटाचा वापर करण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी भारतासाठी ही Win-Win Situation बनली आहे. श्रीलंका सध्या गरिबीचा सामना करीत असल्याने त्यांना पैसे उभे करण्यासाठी देशांतर्गत कंपन्यांचे Privatization करण्याची वेळ आली आहे.
मनी कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेतील टेलिकॉम कंपनीच्या लिलावासाठी कोलंबोमधून अर्जाची मागणी करण्यात आली आहे. आणि समोर आलेल्या तीन कंपन्यांमध्ये रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांचा समावेश होतो(Mukesh Ambani Deal). सध्या अंबानींची जिओ ही कंपनी भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे, वर्ष 2023 मध्ये जिओ मध्ये केवळ ऑक्टोबर महिन्यात 31.59 लाख ग्राहक जोडले होते.