Mukesh Ambani Donation : काल अयोध्येत श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अगदी धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील प्रत्येक माणूस कालच्या त्याच अभूतपूर्व सोहळ्याची वाट पाहत होता, रामलला अयोध्येत विराजमान झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये पर्यटकांची संख्या वाढणार आहे. याचा अधिकाधिक फायदा उत्तर प्रदेश सरकारच्या तिजोरीला होणार असून इथे होऊ घातलेल्या नवनवीन व्यवसायांना देखील यामुळे भरपूर पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होईल. काल आपण राम मंदिराला दिल्या गेलेल्या देणगी बद्दल माहिती मिळवली, मात्र त्यात देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा संदर्भ नव्हता. याचा अर्थ मुकेश अंबानी यांनी मंदिर निर्मला कोणतीही रक्कम दिलीच नाही असा होतो का? तर असे नाही मुकेश अंबानी यांनी देखील राम मंदिराच्या निर्मितीसाठी काही रक्कम देऊ केली आहे ही रक्कम एकूण किती हे आज जाणून घेऊया…
मंदिरासाठी मुकेश अंबानी यांची देणगी किती? (Mukesh Ambani Donation)
कालच आपल्या समोर आलेल्या माहितीनुसार राम मंदिर निर्माणामध्ये देशातील विविध श्रद्धाळू लोकांनी, साधुसंतांनी आणि व्यावसायिकांनी देणगी दिली आहे. मंदिर निर्माणासाठी दिल्या गेलेल्या या भरघोस प्रतिसादातूनच आज अयोध्येत एक भव्य दिव्य राम मंदिर उभं राहणार आहे, मात्र अनेकांना देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रीमंत उद्योगपती म्हणजे मुकेश अंबानी यांनी नेमकी किती देणगी दिली असेल असा प्रश्न सतावतोय. काल मुकेश अंबानी अयोध्येत त्यांची पत्नी नीता अंबानी व संपूर्ण परिवारासह उपस्थित होते आणि माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाने राम मंदिर निर्माणासाठी 2.1 कोटी रुपये राम मंदिराच्या ट्रस्टला दिले आहेत.
मंदिर निर्माणाबद्दल अंबानी कुटुंबाचे भाव काय?
काल झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी त्यांची पत्नी नीता अंबानी व मुलांसह उपस्थित होते. इंडिया टुडे यांच्याशी संवाद साधताना मुकेश अंबानी यांनी सदर ऐतिहासिक क्षणाला उपस्थित राहण्याची संधी मिळाल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद होत आहे असे मत व्यक्त केले व हाच आपला खरा भारत आहे असं म्हणत श्रीरामांच्या चरणी नतमस्तक झाले होते (Mukesh Ambani Donation). राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुकेश अंबानी यांच्यासोबत त्यांची मुलगी ईशा अंबानी ही सुद्धा सामील झाली होती. काल पार पडलेला सोहळा हा एक अत्यंत धार्मिक क्षण होता आणि याचे साक्षी होता येणं ही आपल्यासाठी गर्व्हची बाब आहे असं ईशा अंबानी म्हणाल्या, तसेच नीता अंबानी यांनी देखील संपूर्ण सोहळ्याला ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधलं होतं श्रीरामांचा मंदिरात परतणं हे संपूर्ण देशासाठी दिवाळीच्या सणाप्रमाणेच आहे असंही त्या म्हणाल्या.