बिझनेसनामा ऑनलाईन । भारतात सर्वांत श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत असलेले मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना सर्वजण ओळखतात. रिलायन्स कंपनीचे (Reliance)हेड असलेले मुकेश अंबानी जिओच्या (Jio) माध्यमातून भारतातील मोबाईल टेलिफोन ब्रॉड व्यवसायावर राज्य करत आहे. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून त्यांनी देशातील किराणा व्यवसायात ठसा उमटवला आहे. यानंतर आता अजून एका क्षेत्रासोबत मुकेश अंबानी यांचं नाव जोडलं जाणार आहे. मुकेश अंबानी आता जिओ आणि रिलायन्स नंतर देशातील NBAC या क्षेत्रात उतरण्यासाठी तयार झाले आहे. ते त्यांच्या वित्तीय सेवा कंपनी जिओ फायनान्शिअल सर्विस लिमिटेड JFSL या माध्यमातून देशातील बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व स्थापन करणार आहे. या क्षेत्रात पदार्पण करण्याचा उद्देश भारतातील सर्वात मोठे नॉन बँकिंग कर्जदार बनणे हा आहे. याबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीच्या लिमिटेडच्या नुकत्याच झालेल्या एका वार्षिक अहवाला मधून माहिती मिळाली आहे.
या वार्षिक अहवालामध्ये अंबानी म्हणाले की, डिजिटली वित्तीय सेवा प्रदान करणारी युनिटी भारतीय नागरिकांना वित्तीय सेवांपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल. हे लवकरच होणे अपेक्षित आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, डिजिटल आणि किरकोळ व्यवसायांच्या कौशल्यांचा फायदा याद्वारे घेतला जाणार आहे. त्याचबरोबर रिलायन्सच्या तांत्रिक क्षमतांचा फायदा देखील यामुळे होऊ शकतो. 28 ऑगस्टला रिलायन्सच्या वार्षिक गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये याबद्दल मार्गदर्शन देण्यात येऊ शकते.
दरम्यान, जिओ फायनान्शियल सर्व्हिस लिमिटेडचा रिलायन्समध्ये 6.1 टक्के हिस्सा आहे. त्याचबरोबर कंपनीने मागच्या महिन्यामध्ये ब्लॅक रक सोबत संयुक्त प्रकल्प स्थापन करण्यासाठी पार्टनरशिप करण्याची घोषणा केली होती. रिलायन्स इंडस्ट्रीच्या वर्षभराच्या रिपोर्टनुसार, आर्थिक वर्षात 2022 23 मध्ये रिलायन्स रिटेलर ने 42 टक्क्यांच्या वाढीसह एक अब्ज व्यवहाराचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर रिलायन्स रिटेलच्या डिजिटल कॉमर्स आणि नवीन कॉमर्स व्यवसायांमध्ये या वर्षात 2.60 लाख कोटींच्या कमाईत 18 टक्के योगदान दिले आहे. एवढच नाही तर पूर्वी कंपनीने 3,300 नवीन दुकानें सुरु केली होती. आता या दुकानाची संख्या 18,040 एवढी झाली आहे.