Mukesh Ambani : रिलायन्स कंपनीचे मालक मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात श्रीमंत माणूस आहेत. त्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज या प्रमुख कंपनी अंतर्गत अनेक उपकंपन्या देखील कार्यरत असतात. विविध प्रकारच्या प्रकल्पांना पूर्णत्वास नेऊन ही कंपनी तसेच मुकेश अंबानी अधिकाधिक नाव कमवत आहेत. आतापर्यंत अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होतेच पण आता त्यांची गणना जगभरातील टॉप-100 अब्जाधीशांमध्ये केली जाणार आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्यामुळे आता ते देशभरातील शंभर अब्जाधीशंपैकी एक बनले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स वाढल्यामुळे ब्लूमबर्गच्या अहवालानुसार मुकेश अंबानी यांची नेटवर्थ 102 मिलियन डॉलर्सवर जाऊन पोहोचलेली आहे. जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत ते बाराव्या स्थानावर आहेत तर, 100 बिलियन डॉलर्सची नेटवर्थ असणाऱ्या जगभरातील केवळ 12 अब्जाधीशांमध्ये मुकेश अंबानी यांनी आपले स्थान पक्के केले आहे.
मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत झाली वाढ: (Mukesh Ambani)
गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीचे शेअर्स 5.4 टक्क्यांनी वाढले आहेत आणि म्हणूनच कंपनीचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या वैयक्तिक तिजोरीत देखील तेजी आलेली पाहायला मिळाली. गुरुवारी शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्स मध्ये एकूण 3 टक्क्यांची वाढ झाली व त्यांनी 2724.95 रुपयांचा पल्ला गाठला, त्यानंतर बाजार बंद होताना यात 2.58 टक्क्यांची वाढ झाल्याने दिवसाच्या शेवटी एकूणच आकडा 2718.40 रुपयांवर येऊन थांबला.
गेल्या एका महिन्यात रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सनी 12 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. आणि कंपनीचे एकूण मार्केट कॅप हे 18.40 लाख कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज मधल्या बाकी उपकंपन्या जसे की जिओ फायनान्शिअल सर्विसेस यामध्ये देखील शेअर वाढ झालेली पाहायला मिळाली आणि म्हणूनच मुकेश अंबानी यांच्या संपत्ती मध्ये तेजी आली आहे.
कोण आहेत सर्वात श्रीमंत अब्जाधीश?
ब्लूमबर्ग बिलिओनेर इंडेक्सच्या अहवालानुसार टेस्टला कंपनीचे मालक एलोन मस्क यांच्याजवळ 212 अब्ज डॉलर्सचे नेटवर्थ आहे व म्हणूनच ते सर्वात श्रीमंत अरबपती म्हणून ओळखले जातात. त्यांच्यानंतर अमेझॉनचे मालक जेफ बेजोस हे 180 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळेच दुसऱ्या स्थानावर आहेत आणि फ्रान्सिस बिझनेस मॅग्नेट बर्नार्ड अर्नोल्ड हे 164 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळे तिसऱ्या स्थानावर आहेत. भारतासाठी आनंदाची बाब म्हणजेच आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे 96.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीमुळे 14व्या स्थानावर कायम आहेत.