Mukesh Ambani Threat : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना एका माणसाकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 20 करोड रुपयांची मागणी करणाऱ्या या माणसाने ताबडतोब पैसे द्या, नाहीतर जीव घेऊ अशी धमकी दिली आहे. ई- मेलद्वारे आलेल्या या संदेशामध्ये त्या माणसाने त्याच्याजवळ शार्प शुटर असल्याची भीती अंबानींना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण आता फारच गंभीर झाले असून पोलीसांकडून संदर्भात तपास सुरु आहे.
कोणी दिली अंबानींना धमकी? (Mukesh Ambani Threat)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी या सुप्रसिद्ध उद्योगपतींना ई- मेल द्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 27 ऑक्टोबर रोजी हा संदेश अंबानींना मिळाला होता ज्यात 20 करोड रुपयांची मागणी करण्यात आली होती. अंबानींनी हि मागणी फेटाळून लावल्यास त्यांना जीवे मारण्यात येईल, सोबतच या माणसाजवळ शार्प शुटर असल्याचा धमकी देणारा संदेश (Mukesh Ambani Threat) अंबानींना देण्यात आला होता.
पोलिसांकडून वेळ न दवडता याबद्दल तपास सुरु झाला आहे, आणि या अज्ञात माणसाविरोधात IPC कलम 387 आणि 506(2) याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आधी राकेश कुमार मिश्र नावाच्या एका माणसाने संपूर्ण अंबानी परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती, तसेच संपूर्ण रिलायंस फौंडेशनच्या हॉस्पिटला बॉंबने उडवले जाईल असा संदेश दिला होता. मात्र पोलिसांच्या हुशारीमुळे 30 वर्षांच्या या युवकाला वेळेतच पकडून अटक करण्यात आली होती.