Mukesh Ambani: आशिया खंडातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी सध्या Disney सोबतचा करार आणि अनंत अंबानी यांच्या Prewedding मुळे बरेच चर्चेत आहेत. अंबानी हा नेहमीच आपल्या सारख्या सर्वसामान्य लोकांसाठी चर्चेचा विषय असतोच, आणि जर का ते मोठमोठाल्या कंपन्यांसोबत करार करणार असतील तरीही आपण आवकून समोर आलेल्या आकड्यांकडे पाहत राहतो. डिस्नी सोबत केलेल्या हातमिळवणीनंतर अंबानी मनोरंजन क्षेत्रात बऱ्यापैकी जागा पक्की करून बसले असतानाच आज माध्यमांना आणखीन एक रोमांचक बातमी मिळाली ती काय, हे आज जाणून घेऊया..
अंबानींनी केलाय का नवीन करार? (Mukesh Ambani)
मुकेश अंबानी आणि त्यांच्या रिलायन्स कडून केले जाणारे करार हे नेहमीच सर्वसाधारण लोकंना विचार करायला भाग पडणारे असतात. डिस्नीसोबत हात मिळवणी केल्यानंतर आता पुन्हा एकदा अंबानी नवीन मोहीम काबीज करण्याच्या मार्गावर आहेत, कारण कंपनी रिलायन्स वायकॉम-18 मीडियामध्ये पॅरामाऊंट ग्लोबलमधील वाटा खरेदीची तयारी करत आहे. डिस्नी समूहासोबत केलेल्या महत्वाच्या करारनानंतर आपलं वर्चस्व कायम राहावं म्हणून अंबानी आता नवीन योजना आखात आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीज वायकॉम-10 मध्ये ग्लोबल पॅरामाऊंटचा 13.01 टक्के वाटा खरेदी करेल.
रिलायन्सचे वर्चस्व वाढणार का?
मनोरंजन क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज लवकरच मोठा धमाका करण्याची शक्यता आहे. वृत्तानुसार, रिलायन्स वायकॉम-18 मधील पॅरामाऊंट ग्लोबलचा हिस्सा खरेदी करण्याच्या विचारात आहे, यासाठी रिलायन्सला जवळपास 42 अब्ज रुपये मोजावे लागतील आणि जर हा करार झाला तर रिलायन्स समूहाचा मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रात प्रभाव प्रचंड वाढेल(Mukesh Ambani). सध्या वायकॉम-18 कडे 40 चॅनल्स आहेत आणि यात पॅरामाऊंटचाही समावेश आहे, या करारामुळे रिलायन्सला वायकॉम-18 च्या 40 चॅनल्ससह पॅरामाऊंट प्रोग्रामिंगचा परवानाही मिळेल.