Mukesh Ambani: तब्बल 3 वर्षेनंतर होणार जादू ; अंबानींमुळे पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त

Mukesh Ambani : मागच्या दोन दिवसांपूर्वी आपल्या भारतात श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा एक अभूतपूर्व सोहळा संपन्न झाला आणि आता यानंतर येणारा सर्वात मोठा दिवस असेल तो म्हणजेच लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. एकंदरीत सध्या भारत विकासाच्या, बदलांच्या मार्गावर आहे आणि यामध्ये आशियातील सर्वात मोठे अब्जाधीश आणि रिलायन्स कंपनीचे मालक म्हणजेच मुकेश अंबानी यांच्यामुळे येणाऱ्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती घसरण्याची शक्यता आहे. आता साहजिकपणे तुमच्या मनात प्रश्न उत्पन्न झाला असेल की मुकेश अंबानी यांचा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींशी नेमका संदर्भ काय? कारण दरवेळी पेट्रोल डिझेलच्या किमतींबाबत महत्त्वाचे निर्णय हे सरकारकडून घेतले जातात मात्र आज आम्ही याचे कारण तुम्हाला उलघडून दाखवणार आहोत लक्ष्यात घ्या, जर का अंबानी हे लक्ष साध्य करण्यात यशस्वी झाले तर तब्बल 3 वर्षानंतर अंबानींमुळे देशात हा मोठा बदल घडणार आहे…

अंबानींमुळे पेट्रोल आणि डिझेल कमी होणार का? (Mukesh Ambani)

राम मंदिर प्राणप्रतिष्ठ सोहळ्यानंतर आता आपल्या देशातील सर्वात मोठा क्षण असेल तो म्हणजे सार्वत्रिक निवडणुका. देशभरातील विविध पक्षांच्या याच मार्गाने वेगवेगळ्या आखण्या सुरू झाल्या आहेत व प्रत्येक पक्ष स्वतःच्या कुवातीनुसार आणि विचारसरणीनुसार मार्गक्रमण करत आहेत. दरम्यान देशात घडणारी आणखी सर्वात मोठी म्हणजे येणारा नवीन अर्थसंकल्प, पण या सर्व घडामोडींच्या मध्ये आपल्या देशातील तसेच आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी हे देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार मुकेश अंबानी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यात महत्त्वाचा हातभार लावू शकतात.

डिसेंबर महिन्यात देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्यानंतर पेट्रोलियम मंत्रालयाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता ज्या देशावर निर्बंध नाहीत अशा कोणत्याही देशाकडून भारत कच्चा देण्याची आयात करू शकणार आहे. या नवीन निर्णयामुळे व्हेनेझुएला या देशाकडून तब्बल 3 वर्षांनंतर कच्च्या तेलाचे खरेदी केली जाऊ शकते. काही वर्षांमागे डोकावून पाहिलं तर या देशावर काही निर्बंध घालण्यात आले होते मात्र आता ते निर्बंध कायमचे हटल्यामुळे आपण त्यांच्याकडून कच्च्या तेलाची खरेदी करू शकतो.

मात्र अंबानी यांचा सादर प्रकरणाशी संबंध काय?

व्हेनेझुएला आणि भारत यांच्यामध्ये होऊ शकणाऱ्या या सौद्यामध्ये अंबानी सर्वात मोठा घटक असणार आहेत, कारण भारताकडून हा सौदा करण्याची जबाबदारी मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्याकडे सोपवण्यात आली आहे(Mukesh Ambani). समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीने या देशाकडे सध्या तीन टँकर कच्या तेलाच्या खरेदीचे बुकिंग केलेले असून, जानेवारी 2024 पासून हे तेल भारतात यायला सुरू होईल. आत्ताच्या घडीला आपण रशियाकडून सवलतीच्या दरात कच्च्या तेलाची आयात करतो, मात्र ही सवलत केवळ 2 डॉलर प्रति बॅरल पर्यंत मर्यादित आहे, मात्र जर का आपण व्हेनेझुएला कडून या खरेदीला सुरुवात केली तर आपल्याला 8 ते 10 डॉलर प्रति बॅरलच्या दरांत आणि स्वस्तात कच्चं तेल मिळू शकेल, म्हणूनच एकंदरीत अंबानी हे व्हेनेझुएला आणि भारत यांच्यामध्ये होणाऱ्या सौद्यातील एक महत्त्वाचे घटक ठरणार आहेत.