Mukesh Ambani Net Worth : अंबानी ठरले जगातील 11 वे श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती किती पहा

बिझनेसनामा ऑनलाईन । भारतातील सर्वात जास्त मार्केट कॅपिटल असलेली कंपनी म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि या रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी हे पूर्वीपासूनच सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जातात. 66 वर्षाचे मुकेश अंबानी आता जगातील 11 वे सर्वात श्रीमंत (Mukesh Ambani Net Worth) व्यक्ती बनले आहेत. यापूर्वी ते 13 व्या नंबर वर स्थानी होते. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्क यांचे नाव समोर आले आहे. एलन मस्क कडे सध्या 224 अरब डॉलर एवढी संपत्ती असून फ्रान्स येथील अरबती बर्नार्ड अर्नोल्ड हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

एका दिवसामध्ये 22.3 करोड डॉलरची कमाई- (Mukesh Ambani Net Worth)

ब्लूमबर्ग बिलियनेयर इंडेक्सच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टनुसार आता मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. मुकेश अंबानी यांनी फक्त एका दिवसामध्ये 22.3 करोड डॉलरची कमाई (Mukesh Ambani Net Worth) केली आहे. आता त्यांनी फ्रान्स आणि मेक्सिकोच्या अरबपतींना मागे टाकत यश मिळवलं केले आहे. यासोबतच मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 96.4 अरब डॉलर एवढी असून एका दिवसामध्ये 223 मिलियन डॉलरने वाढली आहे.

ब्ल्यूमबर्गच्या रिपोर्टनुसार भारतीय स्टॉक मार्केटच्या स्ट्रॉंग परफॉर्मन्स मुळे भारतातील अरबपतींच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच या वर्षाच्या सुरुवातीला भारतीय स्टॉक मार्केटने 7.3% उच्चांक मिळवला असून रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स (Mukesh Ambani Net Worth) जानेवारीपासून दहा टक्क्यांपर्यंत वाढले आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये गौतम अदानी हे जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ति बनले होते. त्यावेळी त्यांनी अमेझॉनच्या जेफ बेजोस यांना मागे टाकले होते. परंतु हिडनबर्ग यांनी लावलेल्या आरोपानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये 57 अरब डॉलर रुपयांचे नुकसान झाले आहे. आणि या सोबतच मार्केट कॅप 100 अरब डॉलर पेक्षा जास्त खाली गेला होता. म्हणजेच गौतम अडाणी हे मुकेश अंबानी पेक्षा संपत्ती मध्ये प्रचंड मागे आहे.

राधाकिशन दमानी यांनाही फटका –

सध्या गौतम अदानी यांच्यासोबतच राधाकिशन दमानी यांना देखील फटका बसला आहे. 2020 मध्ये जगातील दुसऱ्या नंबर चे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून राधाकिशन दमानी यांचे नाव समोर येत होते. आतापर्यंत त्यांची संपत्ती मध्ये 2.4 अरब डॉलर एवढी गिरावट आली असून 16.9 अरब डॉलर एवढी झाली आहे.