बिझनेसनामा ऑनलाईन । आजवर आपण अनेक प्रकारच्या डिशबाबत ऐकलं असेल पण तुम्ही कधी नोटा असलेल्या डिश पाहिल्यात का? तुम्ही कोणाच्या तरी लग्नाला गेलात आणि जर तुम्हाला तेथे जेवण्यात नोटांनी भरलेली थाळी दिली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल बरं? आज आम्ही तुम्हाला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सांस्कृतिक केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातील एक किस्सा सांगणार आहोत. अंबानी म्हटलं तर मुमकिन है असंच तुम्ही म्हणाल.
नीता आणि मुकेश अंबानी यांच्या एका कार्यक्रमातील नोटांनी भरलेल्या एका ताटाचा फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. यामध्ये 500 रुपयांच्या नोटा बाऊलमध्ये भरलेल्या दिसत आहेत. आता प्रत्येकाला मनात प्रश्न पडला असेल कि हि कोणती डिश आहे आणि त्याचे नाव काय आहे? या डिशचे नाव काय आहे ते जाणून घेण्यासाठी हि बातमी शेवटपर्यंत पहा.
खरं तर, कार्यक्रमादरम्यान पाहुण्यांना चलनी नोटांसह दिलेली डिश म्हणजे जुन्या दिल्लीतील प्रसिद्ध दौलत की चाट आहे. या चाटमध्ये वापरण्यात आलेली 500 रुपयांची नोट अनेकांसाठी चर्चेचा विषय बनली आहे. डिशचं नाव दौलत कि चाट आहे म्हणून अंबानी यांनी त्यासोबत ५०० रुपयांची नोट ललीय.
ही डिश जुन्या दिल्लीत प्रसिद्ध
जुन्या दिल्लीत दौलत की चाट खूप प्रसिद्ध आहे. जेव्हाही देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे येतात तेव्हा ते या चाटची चव नक्कीच घेतात. दुधापासून बनवलेल्या या चाटचे वैशिष्ट्य म्हणजे ते तोंडात ठेवताच वितळते. तासन्तास दूध मंथन करून ही फेसाळ मिठाई बनवली जाते. नंतर ते रात्री थंड होण्यासाठी सोडले जाते. यानंतर त्यात मावा आणि छेणाही टाकला जातो. नंतर ते द्रोणामध्ये दिले जाते.
दौलत की चाटची वेगवेगळी नावे
जरी त्याचे नाव चाट असले तरी हा एक प्रकारचा गोड पदार्थ आहे. दिल्लीत याला दौलत की चाट म्हणतात. परंतु इतर शहरांमध्ये ते वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. कानपूरमध्ये ती मख्खन मलाई म्हणून ओळखली जाते आणि लखनऊमध्ये ती निमिष म्हणून ओळखली जाते. तर वाराणसीमध्ये त्याला ‘मख्खन मलायो’ म्हणतात. दौलत की चाट बनवण्याचे श्रेय मुरादाबादच्या एका शेतकऱ्याला जाते. खेमचंद आदेश कुमार असे त्यांचे नाव आहे. दिल्लीत त्यांनी सर्वप्रथम सुरुवात केली.