Mukesh Ambani Threat : काही दिवसांपूर्वी एक बातमी समोर आली होती कि देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकी देण्यात आली होती, शार्प शुटरची भीती दाखवत त्यांच्याकडून 200 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. पोलिसांकडून संबंधित तपास सुरु असताना आता पुन्हा एकदा अंबानींच्या नावे एक नवीन धमकीचा ई- मेल आला आहे. आता तर सदर व्यक्तीने अंबानी यांच्याकडे 400 कोटी रुपयांची मागणी केली आहे.
अंबानींच्या नावे अजून एक धमकी : Mukesh Ambani Threat
आता तिसऱ्यावेळी धमकीचा संदेश (Mukesh Ambani Threat) आल्यामुळे परिस्थिती अजून चिघळली आहे. हा अज्ञात माणूस नेमका कोण याच शोध काही अद्याप लागलेला नाही, मात्र आता अंबानींच्या मुंबईच्या निवासस्थानाची सुरक्षा पोलिसांकडून वाढवण्यात आली आहे. पहिल्यांदा धमकीत अंबानींकडून 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर दुसऱ्यावेळा हीच रक्कम वाढवून 200 कोटी करण्यात आली मात्र अंबानींनी याला काहीच प्रतिउत्तर न दिल्यामुळे आता रक्कम वाढवून 400 कोटी करण्यात आली आहेच पण याच सोबत अंबानींना गोळ्या घालून मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
पुढे त्या अज्ञात माणसाने असेही म्हटले कि पोलीस सुरक्षा कितीही वाढवली तरीही त्यांना पकडू शकणार नाही आणि सगळी सुरक्षा तोडून ते अंबानींचा जीव घेऊ शकतात. मुकेश अंबानी यांना आणि परिवाराला याआधी सुद्धा जीवे मारण्याची धमकी मिळाली होती, ज्या प्रकरणाचा शोध घेत पोलिसांनी सदर इसमला अटक केली होती.