Mukesh Ambani Threat : मुकेश अंबानींना धमकी देणाऱ्याला अटक; पहा कोण आहे तो?

Mukesh Ambani Threat : जसं कि तुम्हाला माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या नावे काही धमकीचे संदेश येत होते. त्यांना आत्तापर्यंत पाच वेळा धमकीचे संदेश मिळाले असून धमकी देणाऱ्या माणसाने त्यांचा जीव घेण्याची भीती घातली होती. कितीही पोलिसांची मदत घेतली तरीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू अशी भीतीदायक धमकी देण्यात आली होती पण आता पोलिसांकडून त्या निनावी माणसाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे,. सदर व्यक्तीला आता पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

कोण आहे अंबानींना धमी देणारा (Mukesh Ambani Threat)

उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी तेलंगणातील 19 वर्षाच्या तरुणाला शनिवारी पहाटे मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीची ओळख गणेश रमेश वनपारधी अशी समोर आली असून त्याला त्याने केलेल्या गुन्हाबद्दल 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांच्या मते ते या प्रकरणाबद्दल खोलात जाऊन चौकशी करत आहेत, आणि हा माणूस किशोर वयीन असल्यामुळे यामागे अजून सूत्रधार अश्ण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सर्वात आधी मुकेश अंबानी याना धमकीचा मेल हा 27 ऑक्टोबर रोजी आला होता व अंबानींकडून 20 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती, जर का हि मागणी पूर्ण झाली नाही तर शार्प शुटरची मदत घेऊन अंबानींना जीवे मारण्यात येईल असा तो एकूण संदेश होता. पण मुकेश अंबानी यांनी अश्या धमकीला उत्तर न दिल्यामुळे त्यांना सातत्याने अश्या धमक्या दिल्या जायच्या आणि सोबतच पैश्यांची रक्कम वाढवली जायची. पण आता पोलिसांकडून एक पाऊल सकारात्मकपणे पार पाडल्यामुळे मुकेश अंबानींना (Mukesh Ambani Threat) थोडासा दिलासा मिळाला असेल.