बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे रिलायन्स कंपनीच्या शेअर धारकांसाठी एक महत्त्वाची योजना बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार यावर्षी दिवाळीपूर्वी शेअर धारकांना कंपनीकडून बंपर गिफ्ट मिळू शकते. सप्टेंबरपर्यंत जिओने फायनान्शियल सर्व्हिसेसला लिस्ट करण्याची योजना आखली आहे. या योजनेमध्ये 36 लाख शेअर होल्डर्सचे व्हॅल्यू अनलॉक करण्यात येईल. यानंतर भांडवलाच्या बाबतीत ही कंपनी देशातील पाचव्या नंबरची वित्त कंपनी असेल. यानुसार ही कंपनी थेट बजाज फायनान्स आणि पेटीएम सोबत स्पर्धा करेल.
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी जुलै किंवा ऑगस्टमध्ये रिलायन्स स्टॅटर्जिक इन्वेस्टमेंट मध्ये लिस्टिंग आणि अलॉटमेंटच्या रेकॉर्ड डेटची घोषणा करू शकतात. आणि या कंपनीचं नाव JFSL असू शकतो. मुकेश अंबानी JFSL या कंपनी बद्दल डिटेल मध्ये सांगू शकतील. पण अजून तरी याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही.
सध्या रिलायन्स इंडस्ट्रीज ही मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. जेफरीजच्या मते, Jio Financial Services ची एकूण संपत्ती 28,000 कोटी रुपये आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये JSFL ची 6.1 टक्के भागीदारी आहे. त्याची किंमत सुमारे 96 हजार कोटी रुपये आहे. ग्लोबल ब्रोकरेज फर्म जीपिंग मोर्गण यांच्यानुसार जिओ फायनान्शियल या कंपनीचे शेअर 189 रुपये असू शकतात. त्याचबरोबर जेफरीज 179 रुपये आणि सेंट्रल ब्रोकिंग ने 157-190 रुपये एवढा असू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. रिलायन्स कंपनीचे शेअरचे टारगेट प्राईज जेपी मोर्गण या कंपनीने 2960 रुपये एवढा ठेवले आहे. त्याचबरोबर रिलायन्स कंपनीचे शेअर शुक्रवारी 0.11% निश्चांक गाठला आणि 2635.45 रुपयांनी बंद झाले. मागच्या तीन महिन्यांमध्ये रिलायन्स कंपनीचे शेअर 13% वाढले आहेत.