Multibagger Stock: Mutual Funds आणि LIC ला आकर्षित करणारी ‘ही’ कंपनी आहे तरी कोणती?

Multibagger Stock: Dixon Technologies (India) Ltd या कंपनीचे शेअर्स गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशातील Multibagger Stock म्हणून ओळखला जातोय. कदाचित तुम्ही HDFC Mutual Fund, Nippon India Trustee, PGIM India Trustee यांसारख्या म्युच्युअल फंडस्ची नावं ऐकलीच असतील आणि या कंपनीच्या शेअर्सनी वरील सर्व प्रकारच्या म्युच्युअल फंडस्ना स्वतःकडे आकर्षित केलं आहे, एवढंच नाही तर LIC म्हणजेच आपल्या देशातील सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी देखील Dixon Technologieचे गुणगान गात आहे.

सर्वत्र Dixon Technologies ची चर्चा: (Multibagger Stock)

नोएडा मधील ही Electronics उत्पादन करणाऱ्या या कंपनीने गेल्या वर्षात गुंतवणुकदारांना तब्बल 150 टक्के परतावा देऊन आघाडीचे स्थान प्राप्त केले आहे. इतकेच नाही तर गेल्या पाच वर्षात Dixon च्या शेअरच्या किमतीत 1300 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. याचा अर्थ असा आहे की ज्यांनी पाच वर्षांपूर्वी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्यांना आज त्यांना गुंतवणुकीवर 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळाला आहे. या वाढत्या नफ्यामुळे आणि गुंतवणुकदारांवर विश्वास टिकवून ठेवण्यासाठी ही कंपनी चर्चेत आहे.

ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 च्या तिमाहीत, म्युच्यूअल फंड्सनी (Multibagger Stock) Dixon चे 17.39 टक्के वाटा असलेले 1,04,04,213 शेअर्स विकत घेतले होते. यामध्ये HDFC Mutual Fund 2.66 टक्के, Kotak Emerging Equity Scheme 2.08 टक्के आणि Nippon India Trustee यांनी 2.83 टक्के अशी गुंतवणूक आहे. त्याचबरोबर, भारतीया जीवन विमा महामंडळ (LIC) ने ही 16,93,495 इतके Dixonचे शेअर्स विकत घेतले आहेत.